येथील उत्कर्ष मंडळ व रघुनाथ फडके आयोजित गुरुवर्य पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सवाची यंदा तपपूर्ती असून त्यानिमित्त शनिवार १२ एप्रिल रोजी सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी येथे संध्याकाळी सहा वाजता अभंग, भावगीते तसेच नाटय़गीतांची बहारदार मैफल आयोजित करण्यात आली आहे.
शौनक अभिषेकी, आनंद भाटे, मुग्धा वैशंपायन, आशा खाडिलकर, रघुनाथ फडके हे गायक कलावंत या मैफलीत सहभागी होणार आहेत. त्यांना पं. विश्वनाथ कान्हेरे, साई बँकर, किशोर तेलवणे, जयंत फडके राजेंद्र भावे, गुरनाथ घरत आणि राजेंद्र पित्रे साथसंगत तर राजेंद्र पाटणकर, किशोर सोमण निवेदन करणार आहेत.
त्याआधी तपपूर्तीनिमित्त होणाऱ्या समारंभात ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिककुमार आणि गझलगायिका उषा आमोणकर यांचा सत्कार केला जाणार आहे.
ज्येष्ठ सरोदवादिका पं. झरीन शर्मा प्रमुख पाहुण्या म्हणून तर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुशीलाराणी पटेल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit jitendra abhisheki sangeet mahotsav