नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयात एलेग्रीया या नावाने पाचदिवसीय युवोत्सव होणार आहे. मंगळवारी (ता. २१) पिल्लई महाविद्यालयात एलेग्रीयाची सुरुवात झाली. मोठय़ा धामधुमीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात डी.जेच्या ठेक्यावर नामांकरण सोहळ्यात सहभाग घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरत एकच धूम ठोकली. महाविद्यालयीन जल्लोषाचा खरा आनंद पिल्लईच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी एलेग्रीयाच्या उद्घाटनाच्या वेळी अनुभवला.
नवीन पनवेल येथील पिल्लेज महाविद्यालयाने आपली प्रतिष्ठा सातत्याने उंचावण्यासाठी अनेक अनोखे उपक्रम सादर केले आहेत. त्यापकी यंदाचा एलेग्रीया (ं’ीॠ१्रं) हा एक आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान हा युवोत्सव होणार आहे. या युवोत्सवात मुंबई आणि नवी मुंबईतील ५० महाविद्यालयांतील ४० हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती पिल्लईचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लेज यांनी दिली. पिल्लई महाविद्यालयामधील ४०० विद्यार्थी आणि पिल्लईचे व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य प्रणव पिल्लई यांनी एलेग्रीया युवोत्सवाचे आयोजन केले आहे.
युवोत्सवातील विविध स्पर्धामधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. एलेग्रीयामध्ये मंगळवारी अभिनेते फरहान अख्तर उपस्थित राहणार आहेत. गायक हनी सिंग, कॅामनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेती अश्विनी पुन्नाप्पा, शरीरसौष्ठव स्पध्रेत नावलौकिक कमावलेले मुरलीकुमार यांची उपस्थिती या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. महाविद्यालयाने सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त घेतला आहे.