दामदुपटीचे आमिष दाखवून दाम्पत्यास तब्बल २१ लाखांना गंडा घालणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध सिडको पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.
सुलोचना कौतिकराव टेकाळे (वय ३७, एन ११, हडको, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व तिच्या पतीस दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपी पुष्पा किसन भोजणे व तिचा पती किसन भोजणे (जालना) यांनी टप्प्या-टप्प्याने २१ लाख रुपये उकळले. हे पैसे घेतले गेल्यावर संशय आलेल्या फिर्यादी टेकाळे यांनी आरोपींकडे योजनेची कागदपत्रे मागितली. मात्र, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादीस खोटे धनादेश देऊन पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी टेकाळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rob of 21lakhs to bait of double price