जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गढी शाखेच्या इमारतीच्या खिडकीचे चार गज गॅसकटरने कापून चोरटय़ांनी तिजोरीतील साडेचार लाखांची रक्कम लंपास केली. तिजोरीतील ४ लाख ४० हजार ४४४ रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी बँकेचे शिपाई एम. एम. सय्यद यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. चोरटय़ांचा सुगावा लागावा, या साठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
जिल्हा बँकेच्या शाखेत साडेचार लाखांची चोरी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गढी शाखेच्या इमारतीच्या खिडकीचे चार गज गॅसकटरने कापून चोरटय़ांनी तिजोरीतील साडेचार लाखांची रक्कम लंपास केली. तिजोरीतील ४ लाख ४० हजार ४४४ रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
First published on: 16-12-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of 4 lakh in district bank