महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आणि नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या ‘जलदगती खेळाडू शोध मोहीम’ अंतर्गत जिल्ह्यातील सहा खेळाडूंची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे आयोजित शिबीरात हे सहा खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सहा ते ११ मार्च या कालावधीत प्राथमिक शिबीर घेण्यात आले. या शिबिरांमधून दुसऱ्या फेरीसाठी ६० पेक्षा अधिक खेळाडूंची निवड करण्यात आली. २२ व २३ मार्च रोजी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पांडुरंग साळगावकर यांच्या देखरेखीखाली या खेळाडूंची येथील अनंत कान्हेरे मैदानावर चाचणी घेण्यात आली. या चाचणीतून पुणे येथे होणाऱ्या अंतिम शिबीरासाठी सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये भाविन पटेल, शुभम पांडे, रोहित परब, प्रकाश रोकडे, ऋत्विक मुळे, विराज ठाकूर यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2014 रोजी प्रकाशित
सहा जलदगती गोलंदाजांची निवड
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आणि नाशिक जिल्हा संघटनेच्या वतीने मार्च महिन्यात राबविण्यात आलेल्या ‘जलदगती खेळाडू शोध मोहीम’ अंतर्गत जिल्ह्यातील सहा खेळाडूंची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

First published on: 07-05-2014 at 08:42 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of six fast bowlers