राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येत्या रविवारी (दि. २४) आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी खटाव-माण तालुक्याच्या दौ-यावर येत आहेत. लोकसभा व त्यानंतर येणा-या विधानसभा निवडणुकांच्या चाचपणीसाठी ते दौ-यावर येत असून, पवारांनी स्वत: लढणार नसल्याचे जाहीर केल्याने माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर, विजयसिंह मोहिते-पाटील व रामराजे निंबाळकर हे नाराज नेते इच्छुक असल्याने पवारांच्या खटाव, माण दौ-याकडे फलटण व अकलूजकरांच्या नजरा लागून राहणार आहेत.
शरद पवार रविवारी सकाळी ९ वाजता म्हसवड येथे येणार आहेत. साडेनऊ ते पावणे दहा राऊतवाडी व म्हसवड येथील जिहे-कठापूर योजनेंतर्गत बांधलेल्या बंधा-याचे ते उद्घाटन करणार आहेत. यानंतर त्यांचे पानवण येथे आगमन होणार आहे. येथे साखळी सिमेंट बंधारे पाहणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता व शेतक-यांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील. पुढे विरळी येथे आपल्या फंडातून बांधलेल्या साखळी सिमेंट बंधा-यांचे शरद पवार उद्घाटन करणार आहेत. दुपारी चितळी (ता. खटाव) येथील विकास सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, जिल्हा बँकेच्या स्थलांतरित शाखेचा शुभारंभ व येरळा नदीवरील बंधा-याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर मायणी येथे थेट भेट देऊन खंडाळा तालुक्याकडे ते प्रयाण करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2013 रोजी प्रकाशित
शरद पवार माढा मतदारसंघाच्या चाचपणीसाठी खटाव-माणच्या दौ-यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येत्या रविवारी (दि. २४) आपल्या माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी खटाव-माण तालुक्याच्या दौ-यावर येत आहेत.
First published on: 19-11-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar visit to khatav man for searching of madha constituency