जंगजंग पछाडूनही साथीदार मिळत नसल्याने मुंबईतून दिल्लीला रवाना करण्यात आलेला शिवा गेंडा तिथेही ‘एकटाच’ आहे. दिल्लीला पोहोचून साडेतीन महिने उलटल्यावरही तेथील दोन्ही मादी गेंडा शिवासोबत ‘मत्री’ करायला तयार नाहीत. त्यामुळे शिवाला मुंबईहून दिल्लीला पाठवण्याचा खटाटोप यशस्वी होईल का, याबाबत उद्यान अधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे.
गेली २८ वष्रे मुंबईच्या वीरमाता जिजाबाई उद्यानात राहत असलेल्या शिवा गेंडय़ाला जोडीदार द्यावा या मागणीसाठी प्राणीसंघटना न्यायालयात गेल्या. तेव्हा त्याला साथीदार शोधण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले. ‘शिवा’ला साथीदार मिळवण्यासाठी देशभरातील उद्यानात विनंतीपत्रे पाठवूनही यश आले नाही, तेव्हा दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात त्याला पाठवण्याचे ठरले. या सर्व खटाटोपात सात वष्रे निघून गेली. शिवाचे ३४ वर्षांचे वय पाहता त्याची प्रजननक्षमता कमी झाली असावी, असा काही प्राणीतज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र तरीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ‘शिवा’ला दिल्लीला धाडण्यात आले. दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात १५ वष्रे व आठ वर्षे वयाच्या दोन माद्या आहेत.मुंबईहून शिवाची स्वारी १८ ऑगस्टला निघाली व ७५० किलोमीटरचा प्रवास करून २१ ऑगस्टला दिल्लीत पोहोचली. तीन दिवस बंद िभतींच्या िपजऱ्यांतून प्रवास करताना शिवा गेंडय़ाला अनेक ठिकाणी खरचटले होते. अनोळखी ठिकाणी गेल्याने तो अस्वस्थही होता. त्यामुळे काही दिवस त्याला वेगळ्या िपजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार केले गेले. तेथील वातावरणाला स्थिरावल्यानंतर त्याला मुख्य िपजऱ्यात हलवण्यात आले आहे, अशी माहिती जिजाबाई उद्यानाचे संचालक अनिल अंजनकर यांनी दिली.
‘शिवा’ला मुख्य िपजऱ्यात तीन महिने उलटले आहेत. मात्र शिवा आणि मादी गेंडय़ाचे मिलन होऊ शकलेले नाही. ‘गेंडय़ासारख्या प्राण्यांना, त्यांची इच्छा नसताना एकाच िपजऱ्यात ठेवल्यास ते मारामारी करून एकमेकांना ठार मारण्याचाही धोका असतो. प्रजनन होण्यासाठी नराने मादीला उद्युक्त करणे आवश्यक असते. आमच्या उद्यानातील दोन्ही मादी प्रजननक्षम आहेत. मात्र त्यांनी सहमती दाखवल्याखेरीज शिवाला त्यांच्यासोबत ठेवता येणार नाही, असे दिल्ली उद्यानातील अधिकारी डॉ. पुनीर सेलबम म्हणाले. शिवाच्या प्रजननक्षमतेविषयी बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.अडीच हजार किलो वजनाच्या शिवा गेंडय़ाला दिल्लीत हलवण्यासाठी प्रचंड व्यवस्था करावी लागली होती. शिवाय पाच वष्रे वयापासून गेली २८ वष्रे मुंबईच्या उद्यानाला व वातावरणाला स्थिरावलेल्या गेंडय़ाला आयुष्याच्या या टप्प्यावर दिल्लीमध्ये जाण्याची वेळ आली. साथीदार मिळवण्यासाठी केलेला हा सर्व खटाटोप फलद्रूप होईल का, याची वाट पाहण्याखेरीज उद्यान अधिकाऱ्यांच्या हाती काहीही नाही.