मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच्या सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स (सिस्फा)च्या वतीने ‘हॉट मून’ या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता ज्येष्ठ चित्रकार नाना गोखले आणि जयचंद हेडाऊ यांच्या हस्ते होणार आहे. सिस्फाच्या गॅलरीत रात्रकालीन कार्यशाळेत तयार केलेल्या कलाकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
यात १२५ कलाकार सहभागी झाले होते. या कार्यशाळेत चित्र, शिल्प, इन्स्टॉलेशन, प्रेशर एक्प्रेशन ही ग्राफिक कार्यशाळा आणि सोबतच बॉन फायर, नृत्य नाटय़, संगीत आणि लाईट दॅट शाईन्स या छायाचित्र स्पर्धेची जोड देण्यात आली आहे. सिस्फाच्या शिल्प विभागाच्या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या १० फूट उंचीच्या फायबर माध्यमातील शेतकरी कुटुंब हे शिल्पही प्रदर्शनात राहणार आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत राहणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकात चन्न्ो यांनी केले.