पानटपरी चालकाच्या घरावर छापा मारून पोलिसांनी गोवा व बाबा नावाचा एकूण २३ पोती गुटखा जप्त केला. या गुटख्याची एकूण किंमत अडीच लाख रुपये असून पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
केज शहरातील शुक्रवार पेठ भागातील महंमद तांबोळी याची बसस्थानक परिसरात पान टपरी असून त्याच्या घरी गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. २६ जून रोजी पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्यासह सहकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता तांबोळी याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये गोवा गुटखा १९ पोती व बाबा गुटखा ४ पोती आढळून आली. या सर्व गुटख्यांची एकूण किंमत अडीच लाख रुपये आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Size of 23 sack gutkha