ऑक्टोबरमध्ये झालेल्या १९ वर्षांआतील विभागीय ज्युदो, वजन उचलणे, तायक्वांदो, स्केटिंग, सायकिलग या क्रीडा स्पर्धामध्ये येथील एचपीटी-आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्णपदके मिळविली.
विभागीय स्पर्धा नाशिक, जळगाव, धुळे येथे झाल्या. ज्युदोमध्ये ६१ किलो गटात वैष्णवी मोटकरी, वजन उचलण्यात ७५ किलोखालील गटात प्राजक्त वेताळ, तायक्वांदोमध्ये ४३ ते ४६ किलो वजन गटात दीपाली बडगुजर, स्केटिंगमध्ये क्वॉड्स प्रकारात तेजस एखंडे तर सायकिलगमध्ये २० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सर्वेश धोंडगे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचा प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य एस. एस. जाधव, प्रा. जे. ए. शेख आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sucess of hpt students