शहराच्या झालर क्षेत्रात येणाऱ्या २८ गावांमधील शेतकरी व जमीनमालकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी, तसेच सिडको झालर क्षेत्राचे नगर रचनाकार यांचे लक्ष वेधण्याबाबत झालर किसान संघर्ष समितीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. समितीचे अध्यक्ष अबुल हाश्मी यांच्या अध्यक्षतेखाली व अॅड. प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
समितीचे सदस्य निवृत्त पोलीस उपअधीक्षक गाडेकर, सुनील जयस्वाल, देवेंद्र पाटील यांच्यासह या गावांमधील शेतकरी, प्रतिनिधी उपस्थित होते. झालर क्षेत्रातील ग्रीन झोन मध्यमवर्गीय विकास क्षेत्र गृहीत धरून ५०० चौ.मी. प्लॉटमध्ये ४० टक्के एफएसआय देऊन फार्म हाऊस, बंगलो व कॉटेज बांधण्याचे नियम विकास नियंत्रण नियमावलीत समाविष्ट करावे. झालर क्षेत्र आराखडा तयार करताना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २५ अन्वये सर्वेक्षण व सध्याचा जमीन वापर नकाशा कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण पुन्हा करावे. अल्पभूधारकांच्या जमिनीवरील आरक्षण काढावे, आदी मागण्यांवर या वेळी चर्चा झाली. सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता समितीतर्फे संबंधित गावांमधील शेतकरी व जमीनमालकांच्या वतीने सिडकोचे मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jul 2013 रोजी प्रकाशित
झालर किसान संघर्ष समितीचे उद्या निवेदन
शहराच्या झालर क्षेत्रात येणाऱ्या २८ गावांमधील शेतकरी व जमीनमालकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी, तसेच सिडको झालर क्षेत्राचे नगर रचनाकार यांचे लक्ष वेधण्याबाबत सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता समितीतर्फे सिडकोचे मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorow statement from zalar kisan sangharsha samiti