दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. हा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळण्यात येतो. या दिनानिमित्त विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त गोकुळ मवारे यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातही जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, शशिकांत हदगल, रिता मैत्रेवार, तहसीलदार दत्ता भारस्कर आदी उपस्थित होते. भारतीय दलित पँथरच्या वतीने नवी दिल्ली गेट येथे राजीव गांधी यांच्या पुतळ्यास आमदार एम. एम. शेख यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संजय जगताप, भारतीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष कडुबा गवळे, शहराध्यक्ष अनिल उगले आदी उपस्थित होते. राजीव गांधी जन्मोत्सव समिती व यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ यांच्या वतीने राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार एम. एम. शेख, डॉ. कल्याण काळे, प्र. ज. निकम गुरुजी, नगरसेवक बाळुलाल गुर्जर आदी उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2013 रोजी प्रकाशित
राजीव गांधींना स्मृतिदिनी अभिवादन
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त विविध पक्ष, संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. हा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळण्यात येतो.
First published on: 21-08-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to rajiv gandhi