पनवेल एमजीपी पाणीपुरवठा पाइपलाइन्सच्या दुरुस्तीचे काम सिडकोतर्फे हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कळंबोली आणि पनवेलमधील पाणीपुरवठा २३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते २४ तारखेच्या सकाळी ८ पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा साठा करून तो जपून वापरावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.