युनिसेफच्या YuWaah and iDreamCareerच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुली आपल्या करिअरसाठी मोठी स्वप्ने पाहतात. कौशल्य आधारित (ब्युटी पार्लर, आदरातिथ्य) करिअरपेक्षा जवळपास ६९ टक्के मुली डॉक्टर, इंजीनियर, पत्रकार यांसारखे व्यावसायिक करिअर निवडतात. दुसरीकडे मुलांना करिअरच्या विविध मार्गांबद्दल जाणून घेतात, वेगवेगळ्या करिअरसाठी आवश्यक असलेल्या गरजा आणि कौशल्ये समजून घेतात, मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि घेतात.

युनिसेफच्या अहवालातील हा निष्कर्ष ४९६८ सहभागींच्या प्रतिसादावरून मांडण्यात आला आहे. त्यापैकी २९९९ विद्यार्थ्यांनी व्यावसायिक करिअरला पसंती दिली तर ७०४ विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित करिअरला पसंती देतात.

व्यावसायिक करिअरकडे मुलींचा ओढा जास्त

व्यावसायिक करिअरसाठी विद्यार्थ्यांच्या लिंगनिहाय ( gender-wise) वितरणाच्या दृष्टीने, १८७२ विद्यार्थिनींनी (७२.४२ टक्के) त्यांच्या शालेय शिक्षणानंतर व्यावसायिक करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे, ७०४ पैकी ५६.२५ टक्के विद्यार्थ्यांनी व्यावसायिक करिअर निवडले. दोन्ही प्रकरणांमध्ये ही आकडेवारी षुरुष विद्यार्थ्यांपेक्षा जास्त होते.”

हेही वाचा – गरीब कुटुंबातील मुलींना व्हायचंय डॉक्टर अन् इंजिनियअर! कौशल्य आधारित नोकरीपेक्षा व्यावसायिक करिअरला पसंती; UNICEF

मुलांच्या करिअर निवडीमध्ये दिसते वैविध्य

विशेष म्हणजे, २१ व्यावसायिक करिअर क्लस्टर्सपैकी सरकारी आणि संरक्षण सेवा ही मुल आणि मुली दोघांच्या करिअर निवडीसाठी सर्वोत लोकप्रिय निवड होती. इतरांपैकी, मुलींनी वैद्यकीय विज्ञान आणि अध्यापन यांसारख्या करिअर पर्यायांना पसंती दिली तर मुलांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले.

युनिसेफच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, “जेव्हा सहभागी मुले आणि मुली मूलभूत आणि प्रगत करिअरपर्यायांबाबत किती जागरुक आहे याचा विचार केला जातो, तेव्हा मुले उच्च शिक्षण घेताना करिअरशी संबंधित माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळवतात.”

हेही वाचा – Female Genital Mutilation : महिलांच्या खतना प्रथेवरील बंदी कायम; या देशाच्या संसदेने ‘ते’ विधेयक का धुडकावले?

विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीवर कोणाचा प्रभाव जास्त?

याव्यतिरिक्त, निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की,”कुटुंबातील सदस्य (३० टक्के), शाळेतील शिक्षक (१३ टक्के), मित्र (४ टक्के) हे मुले आणि मुली दोन्ही विद्यार्थ्यांसाठी करिअर-संबंधित निर्णय घेण्याकरिता सर्वोच्च प्रभावशाली आहेत. इतर ४ टक्के सहभागींनी बाह्य किंवा शालेय समुपदेशकांची मदत घेतली उर्वरित ४९ क्के सहभागींकडे प्रश्नाचे उत्तर नव्हते.

निष्कर्षांवरून असेही दिसून आले आहे की, एकूण सहभागींपैकी ९.३६ टक्के (४९६८ पैकी ४६५) यांनी अभ्यासापूर्वी करिअर मार्गदर्शन घेतली होती.

असे झाले सर्वेक्षण?


UNICEF द्वारे २५ भारतीय राज्यांमधील इयत्ते ९-१२ मधील विद्यार्थ्यांकडून ही माहिती गोळा केली. पाच महिन्यांच्या कालावधीत (ऑगस्ट२०२३ – डिसेंबर २०२३) एकूण ४९६८ प्रतिसाद संकलित केले गेले आणि विश्लेषणासाठी वापरले गेले. ४९६८ सहभागींपैकी विद्यार्थिनींची संख्या ३०२२ (६१.०५ टक्के) आणि पुरुष विद्यार्थ्यांची संख्या १९४६ (३९.१७ टक्के) होती. अभ्यासातील सहभागी हे प्रामुख्याने हिंदी भाषिक उमेदवार आहेत, जे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील आहेत.

एकूण १७४० विद्यार्थी इयत्ता १२ मधील होते, त्यापैकी ५२० पुरुष आणि १२०० महिला होत्या. एकूण ११९६ विद्यार्थी इयत्ता ११ मधील होते, त्यापैकी ४९७ पुरुष आणि ६६९ महिला होत्या. इयत्ता १० मधील एकूण १२२७ सहभागींनी त्यापैकी ५२० पुरुष आणि ७०७ महिला होत्या. इयत्ता ९ मधील एकूण ८०५ विद्यार्थी होते, त्यापैकी ३८९ पुरुष आणि ४२६ महिला होत्या. ९५ टक्के सहभागींचे वार्षिक उत्पन्न १.४-३.४ लाख रुपये होते.