रविवारी झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताने सट्टेबाजारातील गणितेच बदलून टाकली. भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान देण्यासाठी सट्टेबाज उत्सुक नव्हते. परंतु आता भारत थेट अंतिम फेरीत पोहोचेल, यासाठी ऑस्ट्रेलियानंतर भाव सध्या देऊ केला आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप अग्रस्थानी असून त्या पाठोपाठ भारत आहे. ऑस्ट्रेलियासाठी ३५ पसे तर भारताला ५५ पसे भाव देऊ केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, तेव्हापासूनच सट्टेबाजारात चतन्य पसरले. विराट कोहली शतक करील हा सट्टेबाजांचा होरा साफ चुकला. मात्र शिखर धवनने शतक करून ती कमतरता भरून काढली. भारताने धावसंख्येचे त्रिशतक पूर्ण केले, तेव्हा सट्टेबाजारात भारताच्या बाजूने कौल वाढला. भारतच जिंकणार यावर करोडोंचा सट्टा लागलेला असल्यामुळे निकालाने पंटर्सही खूश झाले. १५० धावसंख्येच्या आत दक्षिण आफ्रिकेचे पाच बाद झाल्यानंतर भारताचा वधारत गेलेला भाव शेवटपर्यंत कायम राहिला. एका क्षणाला भारताचा भाव १० पशांवर आला. आता भारताकडून सट्टेबाजांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
ता.क. : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि न्यूझीलंडला सध्या सट्टेबाजारात महत्त्व आले आहे. वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याबाबत सट्टेबाज साशंक आहेत. त्यापैकी वेस्ट इंडिजला झुकते माप दिले आहे.
सामन्याचा भाव
वेस्ट इंडिज : ६५ पसे; झिम्बाब्वे : सव्वा रुपया.
निषाद अंधेरीवाला
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2015 रोजी प्रकाशित
सट्टे पे सट्टा : अंदाज चुकला!
रविवारी झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताने सट्टेबाजारातील गणितेच बदलून टाकली. भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान देण्यासाठी सट्टेबाज उत्सुक नव्हते. परंतु आता भारत थेट अंतिम फेरीत पोहोचेल, यासाठी ऑस्ट्रेलियानंतर भाव सध्या देऊ केला आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप …
First published on: 24-02-2015 at 12:02 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About betting in world cup