रविवारी झालेली भारत-पाकिस्तान मॅच महत्त्वाची होती. तशी ती प्रत्येक वेळी महत्त्वाचीच असते. विश्वचषकाचा पहिला सामना आणि तोही पाकिस्तानबरोबर, त्यामुळे या सामन्याची सर्वानाच फार मोठी उत्सुकता होती. कारण असे नेहमीच महत्त्वाचे असते की, कोणत्या दोन संघांमध्ये सामना आहे; पण
आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आपल्यापुढे आहे. पहिला सामना पाकिस्तानबरोबर सहज जिंकलोय, पण आफ्रिकेचा हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातो. एक स्ट्राँग सलामी लागेल आपल्याला, त्याचबरोबर रनिंग बीटविन दी विकेट चांगली लागेल. कारण धावा करणे सोपे नसेल. त्यांची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. पाकिस्तानविरुद्ध तुम्ही विलपॉवर आणि इमोशनवर मॅच खेळता, पण तसे या वेळी होऊ शकत नाही. कारण त्यांचा संघ जगात अव्वल आहे. आफ्रिकेचा डेल स्टेन जो आहे तो सर्वात जास्त आव्हानात्मक असेल. तो एक चॅम्पियन बोलर आहे; पण पाकिस्तानच्या विजयानंतर संघात पॉझिटिव्ह एनर्जी असेल आणि आता घोडामैदान लांब नाहीए. सोमवारी आपण चर्चा करूही, की भारताने आफ्रिकेला हरवलेय; पण पराभव झाला तरी मानाने हरण्याची गंमत फक्त खेळामध्येच आहे. प्रत्येक सामना नवीन असल्याने तुम्हाला तुमचा मीटर पुन्हा झिरोवर सेट करावा लागतो, त्यामुळेच मला सामना नाटकासारखा वाटतो. मालिकेमध्ये टीआरपी घेऊन आपण काम करत असतो. आम्ही असे म्हणतो की, जेव्हा नाटकाचा पहिला प्रयोग उत्तम होतो ना तेव्हा दुसरा प्रयोग फार जपून करायचा असतो. प्रत्येक नाटकाला तीच प्रकाशयोजना, नेपथ्य, कलाकार, संवाद तेच असतात तरी तो प्रत्येक वेळी वेगळा होतो व त्यामुळे आपण त्याला नाटकाचा प्रयोग म्हणतो. त्यामध्ये उन्नीस-बीस होणारच. मला वाटते आपली जबाबदारी आता वाढलीय. विश्वचषकाचा दुसरा प्रयोग भारत जिंकेल, अशी मला आशा आहे. टीम इंडियाला मन:पूर्वक शुभेच्छा!
शब्दांकन : प्रसाद लाड
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2015 रोजी प्रकाशित
दुसरा प्रयोगही भारत जिंकेल!
रविवारी झालेली भारत-पाकिस्तान मॅच महत्त्वाची होती. तशी ती प्रत्येक वेळी महत्त्वाचीच असते. विश्वचषकाचा पहिला सामना आणि तोही पाकिस्तानबरोबर, त्यामुळे या सामन्याची सर्वानाच फार मोठी उत्सुकता होती.

First published on: 19-02-2015 at 05:12 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will win next experiment swapnil joshi