तिरंगी क्रिकेट स्पध्रेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला शिखर धवन विश्वचषक स्पध्रेत एकाएकी सातत्याने धावा कसा करू लागला.. त्याला असा कोणता गुरूमंत्र मिळाला? की तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.. या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘शास्त्री’य आहे. म्हणजेच रवी शास्त्री हाच त्याच्या यशाचा शिल्पकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘‘विश्वचषक स्पध्रेपूर्वी शास्त्रींनी धवनच्या मनात चैतन्य निर्माण करणारा कानमंत्र दिला आणि त्यामुळेच त्याच्या कामगिरीचा आलेख पुन्हा चढता झाला,’’ असे संघाच्या सूत्रांनी सांगितल़े  
भारतीय संघाच्या मदतनिसांपैकी एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, ‘‘विश्वचषक सुरू होण्यापूर्वी शास्त्री यांनी धवनसह प्रदीर्घ चर्चा केली आणि त्याला उत्साहपूर्ण मार्गदर्शन केल़े  आमच्यापैकी बऱ्याच जणांनी शास्त्री यांचे व्याख्यान ऐकले आहे, ते खेळाडूंना प्रेरणा देणारे आह़े  त्याचा चांगला फायदा झाला, हे धवनच्या कामगिरीतून पुन्हा एकदा पाहायला मिळाल़े ’’
‘‘शास्त्री क्रिकेटच्या मुद्दय़ांवर चर्चा करत नाही किंवा खेळाडूला भेडसावणाऱ्या तांत्रिक समस्येवरही बोलत नाही़  या मुद्दय़ांवर प्रमुख प्रशिक्षक डंकन फ्लेचरसह संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर हे तीन प्रशिक्षक चर्चा करतात़  शास्त्रींसाठी खेळाडूला वेळ देणे आणि त्याच्या मनात नक्की काय चालले आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आह़े,’’ असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘या बैठकीत खेळाडू काहीच बोलत नाही़  फ्लेचर आणि भरत बैठकीला मार्गदर्शन करतात आणि सरावाविषयी चर्चा होत़े  महेंद्रसिंग धोनीही बैठकीला शांत बसणे पसंत करतो़  त्याला कधी बोलताना मी पाहिले नाही़  पण, हो संघ अडचणीत असताना धोनी बैठकीत आपले मत जरूर मांडतो़ ’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri pep talk behind shikhar dhawan success