‘‘मी यापुढे गुरू गोविंद सिंग क्रीडा महाविद्यालयात पाऊल ठेवणार नाही,’’ हे वाक्य तो ११ वर्षांचा मुलगा वारंवार ओरडून सांगत होता. हे सांगताना त्याच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. कुटुंबातील सर्व व्यक्तींनी त्याला विनंती-सूचना करून पाहिल्या; परंतु तो कुणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सुरेश
रैना कुटुंबीय हे पंजाबी ब्राह्मण. काश्मिरी पंडित म्हणून जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर भागातील रैनावारी भागात त्यांना चांगला मानसन्मान मिळत होता. सुरेशचे वडील त्रिलोक चंद हे निवृत्त लष्करी अधिकारी आणि आई परवेश ही गृहिणी. १९८०च्या दशकात या कुटुंबीयांनी श्रीनगरहून स्थलांतर करून उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्हय़ात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुरेशला तीन भाऊ- दिनेश, नरेश आणि मुकेश
सुरेशची क्रिकेट कारकीर्द सावरणारा भाऊ दिनेश त्याच्या अभ्यासाचीसुद्धा काळजी घ्यायचा. पहाटे साडेपाच वाजता दिनेश त्याची शिकवणी घ्यायचा; परंतु बऱ्याचदा सामने आणि दौऱ्यांमुळे त्याला अभ्यासाकडे लक्ष देणं कठीण जायचं. मात्र सुरेशनं दिनेशला शिक्षा देण्याची कधीच संधी दिली नाही. कारण सुरेश घरी यायचा, तेव्हा बऱ्याचदा त्याच्यासोबत जेतेपदाचा चषक, सामनावीर पुरस्कार किंवा प्रमाणपत्र असायचं. त्यामुळे त्याच्या खेळाचं कुटुंबातील सर्वच जण दिलखुलास कौतुक करायचे. सुरेश रात्री झोपताना आपल्या उशीखाली काडेपेटी ठेवायचा. सकाळी उठून मैदानावर जाताना लाइट लावल्यास सर्वाची झोपमोड होणं, हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. पुढे १६ वर्षांखालील संघाचा तो कप्तान झाला. मग उत्तर प्रदेशकडून रणजी खेळत त्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि भारतीय संघाची दारं त्याच्यासाठी खुली झाली. खेळातून वेळ काढून दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा तो उत्तीर्ण झाला.
विश्वचषकानंतर सुरेशचं लग्न होणार, अशी चर्चा सध्या आहे. त्याची भावी पत्नी कोण, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्या प्रेमप्रकरणाला प्रसारमाध्यमांनी खमंग फोडणी दिली होती. सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारी अनुष्का शर्मासुद्धा सुरेशला आवडायची; परंतु या वावडय़ा खऱ्या नसल्याचं सुरेशनंच प्रसारमाध्यमांना ठणकावून सांगितलं होतं. विवाहासाठी सज्ज झालेला सुरेश पाककलेतही माहीर आहे. अनेक चांगले पदार्थ त्याला बनवता येतात. हे पदार्थ तो कुठे बनवायला शिकला, याबद्दल त्याची आईसुद्धा अनभिज्ञ आहे. त्यामुळे सुरेशच्या आयुष्याची जोडीदारीण कोण असेल, याबाबत क्रिकेटरसिकांना उत्सुकता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2015 रोजी प्रकाशित
..आणि तो सावरला!
‘‘मी यापुढे गुरू गोविंद सिंग क्रीडा महाविद्यालयात पाऊल ठेवणार नाही,’’ हे वाक्य तो ११ वर्षांचा मुलगा वारंवार ओरडून सांगत होता.

First published on: 16-03-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina an indian cricketer