सार्वजनिक क्षेत्रातील भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. बँकेने आपल्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत आपले पॅन आधार कार्डला लिंक करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. जर ग्राहकांनी आपले पॅन आधार कार्डला लिंक केले नाही तर त्यांची बँकिंग सेवा ठप्प होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. एसबीआयने यासंबंधी एक ट्विटदेखील केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३१ मार्चपर्यंतच करता येणार लिंक

‘कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांचा पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला देतो.’ असे बँकेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

करोना महामारी लक्षात घेता केंद्र सरकारने पॅन आधारकार्डला लिंक करण्याचा अवधी ३० सप्टेंबर २०२१ पासून वाढवून ३१ मार्च २०२२ केली आहे. एसबीआयने यापूर्वीही यासंबंधी ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी त्यांचा पॅन आधारशी लिंक करा.’ यासोबतच, पॅन आधरसोबत लिंक करणे अनिवार्य असल्याचं देखील बँकेकडून सांगण्यात आलं होतं. पॅन आणि आधार लिंक नसल्यास, पॅन निष्क्रिय होईल आणि स्पेसिफाइड व्यवहार करण्यासाठी पॅन वापरता येणार नाही.

(हे ही वाचा: आता गरज भासल्यास पीएफ अकाऊंटमधून काढता येणार एक लाखांपर्यंतची रक्कम; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)

असे करा पॅन आधार कार्डला लिंक

पहिली पद्धत

१. सर्वात आधी आयकरचे अधिकृत संकेतस्थळ https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जा.
२. येथे डाव्या बाजूला आधार कार्ड लिंक करण्याचा (Link Aadhaar) पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
३. एक नवीन पेज उघडेल, येथे आपल्याला पॅन, आधार आणि आधार कार्डावर आपले नाव जसे लिहले आहे ती माहिती भरायची आहे.
४. जर तुमच्या आधार कार्डवर तुमच्या जन्माचे फक्त साल असेल तर ‘I have only year of birth in aadhaar card’ या बॉक्सवर क्लिक करा.
५. कॅप्चा कोड टाकून ओटीपीसाठी क्लिक करा.
६. लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमचे पॅन आणि आधार लिंक होईल.

दुसरी पद्धत

>>तुम्ही एसएमएसद्वारे देखील पॅन आधारला लिंक करू शकता.
>>यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDPAN<12-digit Aadhaar><10-digit PAN> टाईप करावे
>>हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवावा. लगेचच तुमचे पॅन आधारला लिंक केले जाईल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi alert failure to comply with this condition will result in termination of banking services pvp
First published on: 17-01-2022 at 16:12 IST