मुंबई : जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि त्या परिणामी देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा उत्साह दाखवल्याने सेन्सेक्सने शुक्रवारच्या सत्रात ४६२ अंशांची कमाई केली. सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकांची आगेकूच कायम असून दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने ९०५ अंशांची भर घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सप्ताहाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४६२.२६ अंशांनी वधारून ५२,७२७.९८ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ६४४.१५ अंशांची झेप घेत ५२,९०९.८७ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४२.६० अंशांची वाढ झाली आणि तो  १५,६९९.२५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक बाजारातील तेजी देशांतर्गत भांडवली बाजारात प्रतिबिंबित झाली. याचबरोबर देशांतर्गत पातळीवर वस्तू आणि सेवांच्या किमतीत आलेल्या नरमाईमुळे भांडवली बाजारात त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. माहिती तंत्रज्ञान वगळता इतर सर्व क्षेत्रांतील समभागांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ,इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवित होते. दुसरीकडे टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टीसीएस, विप्रो आणि सन फार्माच्या समभागात घसरण झाली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex moves 462 points positive hint domestic level ysh