मुंबई : मंदीच्या सावटाखालील जागतिक बाजारातील नकारात्मकता आणि व्याजदरात वाढीची भीती यामुळे व्याजदराबाबत संवेदनशील बँका आणि वाहन उद्योगांतील समभागांमध्ये झालेल्या विक्रीने बुधवारी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलग दुसऱ्या सत्रात तोटा वाढवत नेत, सेन्सेक्स १६८.०८ अंशांनी घसरून, ५९,०२८.९१ वर स्थिरावला. दिवसभरात तो ५९ हजारांच्या पातळीखाली म्हणजेच ४७४.१ अंशांनी गडगडून ५८,७२२.८९ पर्यंत खाली आला होता. बरोबरीने एनएसईचा निफ्टीही ३१.२० अंशांनी घसरून १७,६२४.४० वर दिवसअखेरीस स्थिरावला.

अमेरिकेतील रोजगारविषयक सकारात्मक आकडेवारीने बाजाराला उत्साह मिळवून देण्याऐवजी, प्रत्यक्षात गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का दिला. कारण त्यामुळे मंदीविषयी चिंता न करता मध्यवर्ती बँकेची व्याजदरांसंबंधी आक्रमकमेला पुढेही वाव राहिल, अशी चिंता गुंतवणूकदारांमध्ये वाढत आहे. जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवणार असल्याचेच ताज्या आर्थिक आकडेवारीवरून सूचित होते . दरम्यान आघाडीच्या समभागांना विक्रीचा फटका बसून त्यांचे मूल्य आणि परिणामी त्यांचे प्रतिनिधित्व करणारे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकही घसरले असले तरी, व्यापक बाजारपेठेत त्याच्या विपरीत चित्र होते. परिणामी, मधल्या व तळच्या फळीतील समभागांचे निर्देशांक अर्थात बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक हे अनुक्रमे ०.७३ टक्क्यांनी आणि ०.४६ टक्क्यांनी वाढले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market update sensex nifty settle lower amid weak global markets zws