14th March Panchang Rashi Bhavishya: १४ मार्च २०२४ ला सूर्य मीन राशीत गोचर करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज भरणी नक्षत्रात फाल्गुन कृष्ण पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आज मेष राशीत चंद्र असून घर घेण्यासाठी, विवाहासाठी व नवीन वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ योग आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१४ मार्च गुरुवार विशेष राशी भविष्य

मेष:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. जास्त धाडस करू नका. व्यावसायिक प्रगतीचे दर उघडेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कामात चंचलता आड आणू नका.

वृषभ:-व्यावसायिक बदलाचे वारे मनात वाहू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्बेतीच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.

मिथुन:-मनातील आकांक्षा विनासायास पूर्ण होतील. तरुण वर्गाने कसलीही घाई करू नये. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.

कर्क:-महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका. धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा. भावंडांची काळजी लागून राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.

सिंह:-तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. वरिष्ठांच्या शाबासकीस पात्र व्हावे. प्रेमप्रकरणातील जवळीक त्रासदायक ठरू शकते. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. जवळचा प्रवास घडेल.

कन्या:-मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. कामात चिकाटी ठेवावी लागेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो. अति अपेक्षा बाळगू नका.

तूळ:-हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. कामात कसलीही घाई उपयोगाची नाही. डोके ठिकाणावर ठेवून वागावे. कौटुंबिक बाजू ध्यानात घेऊन वागावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

वृश्चिक:-जोडीदाराशी अनबन टाळावी. स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. आपल्या वागण्याने कोणी दुखवणार नाही याची काळजी घ्यावी. सत्य-असत्याची खातरजमा करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.

धनू:-बाह्यरुपावर भुलू नका. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल. तुमची काम करण्याची शक्ति वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

मकर:-सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. तुमच्या संभाषणाची उत्तम छाप पडेल. कामात अधिक उत्साह येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

कुंभ:-व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. तुमची मानमान्यता वाढेल.

मीन:-नैराश्याला बळी पडू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मैत्रीचे नाते जपावे. जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 march 2024 panchang horoscope guruvaar surya gochar mesh to meen rashi impact marathi daily astrology news today svs