जोतिष्यशास्त्रात राहूला “मायावी ग्रह” म्हणून ओळखलं जातं. हा असा ग्रह आहे जो व्यक्तीच्या जीवनात अचानक बदल घडवतो — कधी चांगले तर कधी वाईट. राहू साधारणतः एका राशीत १८ महिन्यांपर्यंत राहतो आणि पुन्हा त्या राशीत परत यायला जवळपास १८ वर्षे लागतात. सध्या राहू शनीच्या कुंभ राशीत विराजमान आहे आणि २०२६ च्या अखेरपर्यंत तिथेच स्थिर राहणार आहे. या काळात राहूचा इतर ग्रहांशी योग किंवा युती घडली की शुभ-अशुभ परिणाम घडतात. सध्या राहूने शुक्राबरोबर एक अद्भुत संयोग निर्माण केला आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात “नवपंचम राजयोग” म्हणतात. हा योग इतका प्रभावी आहे की तो व्यक्तीच्या भाग्याला नव्या उंचीवर नेऊ शकतो.

या काळात शुक्र तूळ राशीत प्रवेश केला आहे तर राहू कुंभ राशीत आहे. अशा स्थितीत राहू पंचम भावात आणि शुक्र नवम भावात विराजमान आहेत. पंचम आणि नवम भाव यांचा संयोग म्हणजेच नवपंचम योग — जो एक अत्यंत शुभ योग मानला जातो. या संयोगामुळे तीन राशींच्या जीवनात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राशी म्हणजे तूळ, कुंभ आणि धनु.

तूळ राशी – नशिबानं घेतली उचल!

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. लग्न भावात शुक्र आणि पंचम भावात राहू यांचा संयोग झाल्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. या योगामुळे तुला राशीवाल्यांच्या जीवनात संपन्नता, वैभव आणि इच्छापूर्तीचे दिवस येऊ शकतात. जे लोक ग्लॅमर, कला, फॅशन, डिझायनिंग, ब्युटी, पार्लर, इंटिरियर डेकोरेशन किंवा हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ मिळेल. व्यापारातील थांबलेली गती पुन्हा सुरू होईल आणि नवीन करार किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे.

अनेक लोकांना नोकरीत पद्दोन्नती मिळेल किंवा चांगली नवी नोकरी मिळू शकेल. काहींच्या आयुष्यात आलिशान घर, वाहन खरेदी किंवा वैभवाच्या गोष्टींना सुरुवात होईल. अनेक वर्षांपासून ज्या इच्छांचा पाठपुरावा चालू होता, त्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ भाग्यवर्धक असून शिक्षणात उत्कृष्ट यश मिळू शकतं. एकूणच, शुक्र आणि राहूच्या या संयोगामुळे तूळ राशीच्या लोकांचं नशीब नव्या उजेडात चमकू लागेल.

कुंभ राशी – भाग्याचे दार उघडणार

राहू सध्या कुंभ राशीतच स्थिर आहे आणि शुक्र भाग्य भावात विराजमान आहे. हा योग कुंभ राशीसाठी अतिशय शक्तिशाली ठरणार आहे. शुक्र भाग्याचा आणि राहू कर्माचा सूचक ग्रह असल्यामुळे दोघांच्या संयोगाने या राशीच्या लोकांना अप्रत्याशित यश मिळू शकतं. अनेकांचे जुने प्रयत्न आता फळाला येतील, अडकलेली कामं सुटतील आणि भाग्याची साथ अखेर मिळेल.

राजकारण, प्रशासन, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत लोकांना हा काळ मोठा लाभ देणारा ठरेल. काहींना नवं पद किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. घर, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योगही दिसून येतात. व्यापार करणाऱ्या लोकांना मोठ्या ऑर्डर्स मिळतील, आणि जुनी गुंतवणूक आता नफा देऊ शकते. शिक्षण आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही ही वेळ आशादायक आहे. दीर्घकाळ अपूर्ण राहिलेली स्वप्नं आता पूर्णतेकडे वाटचाल करतील.

धनु राशी – नशि‍बाचं चक्र फिरलं!

धनु राशीच्या लोकांसाठी राहू-शुक्र नवपंचम योग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या भावात राहू आणि एकादश भावात शुक्र आहे. या संयोजनामुळे साहस, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि प्रभाव वाढेल. छोट्या प्रवासांमधून मोठे लाभ मिळू शकतात. काहींना नवे मित्र किंवा सहकारी मिळतील जे करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला करतील.

भाऊ-बहिणींबरोबरचे ताणतणाव कमी होतील आणि कौटुंबिक जीवनात सौहार्द वाढेल. या काळात धनु राशीच्या लोकांचा सामाजिक प्रभाव वाढू शकतो. व्यवसायासाठी केलेले छोटे निर्णय मोठा नफा देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ बदलाचा आहे – पदोन्नती किंवा नव्या जबाबदाऱ्यांचे संकेत मिळतील. संवादकौशल्य आणि पराक्रमामुळे अनेक क्षेत्रांत नाव कमवता येईल.

नवेंबर महिना का आहे खास?

नवेंबर २०२५ हा महिना ज्योतिषदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात एकाच वेळी हंस राजयोग, नवपंचम राजयोग, रुचक योग आणि विपरीत राजयोग यांचा संगम होत आहे. हे योग १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकतील. पण विशेषतः तूळ, कुंभ आणि धनु राशींसाठी हा काळ त्यांच्या जीवनाचा “सुवर्णकाळ” ठरू शकतो.

राहू आणि शुक्र यांच्या या नवपंचम राजयोगामुळे तूळ, कुंभ आणि धनु राशींच्या जीवनात नवीन दिशा, नवी ऊर्जा आणि प्रगतीचे दार उघडणार आहे. या काळात घेतलेले निर्णय, सुरू केलेले नवे उपक्रम आणि केलेली मेहनत भविष्यात मोठं फळ देणार आहे. राहूचा गूढ प्रभाव आणि शुक्राची सौंदर्यदायी, वैभवशाली ऊर्जा मिळून तयार झालेला हा संयोग निश्चितच तीन राशींचं भाग्य उजळवणारा ठरेल.