Baba Vanga Predictions October, November, December: बाबा वेंगा यांची भाकिते नेहमी चर्चेत राहतात. ती फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या नंतर खऱ्या ठरल्या. साल २०२५ बद्दलही त्यांनी काही आश्चर्यकारक भाकितं केली होती, ज्यात युद्ध, राजकीय घडामोडी आणि नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश होता.
आता जर २०२५ च्या शेवटच्या तीन महिन्यांविषयी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरबद्दल बोलायचं झालं, तर बाबा वेंगा यांच्या मते, हे ९० दिवस काही राशींकरिता खूप शुभ ठरू शकतात. या महिन्यांत त्या चार राशींचं भाग्य उजळेल आणि त्या लोकांना आनंद, यश व प्रगतीचा लाभ मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया, त्या ४ लकी राशी कोणत्या आहेत, ज्यांना वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत फायदा मिळू शकतो.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, वर्ष २०२५ चे शेवटचे तीन महिने वृषभ राशीसाठी खूप शुभ राहतील. या काळात या लोकांवर सूर्यदेवाची खास कृपा असेल. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील, ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तुमची मेहनत सफल होईल. एकंदरीत कामकाजात वेगाने प्रगती होईल आणि मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातही आनंद आणि शांती राहील. या तीन महिन्यांत अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळेल. एकूणच हा काळ वृषभ राशीवाल्यांसाठी यश आणि आनंदाने भरलेला असेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी २०२५ चे शेवटचे तीन महिने खूप शुभ ठरतील. या काळात गुरू देवाच्या कृपेने भाग्य उजळेल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि सन्मान मिळू शकतो, तर व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. कुटुंबात आनंद आणि शांती राहील. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल. आरोग्याच्या अडचणी कमी होतील आणि मन आनंदी राहील. एकूणच हा काळ मिथुन राशीसाठी यश आणि सुखाने भरलेला असेल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी २०२५ चे शेवटचे तीन महिने भाग्यवान ठरतील. शनी देवाच्या कृपेने या काळात तुमचं नशीब उजळेल. खूप दिवसांपासून चालू असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि नवीन मार्गांनी धनलाभ होईल. करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. या काळात तुम्हाला नवीन मालमत्ता किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आपल्या लोकांचा आधार मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मेहनतीचं उत्तम फळ मिळेल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२५ चे शेवटचे तीन महिने खूप शुभ ठरतील. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये नवे यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठ्या फायद्याच्या संधी मिळतील. कुटुंबात आनंद व शांती राहील आणि जोडीदारासोबत नात्यात गोडवा वाढेल. या काळात धन, सन्मान आणि यश मिळेल. एकूणच ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ कुंभ राशीसाठी आनंद आणि प्रगतीने भरलेला असेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)