Budh Gochar 2025 : वैदिक पंचांगानुसार शुक्रवारी (२३ मे) बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र व संवादाचा कारक ग्रह बुधाने मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुधाच्या या गोचरामुळे काही राशींच्या लोकांसमोर संकटांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना बुध ग्रहाच्या राशिबदलामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कारण- या राशींशी संबंधितांना आर्थिक, कौटुंबिक व करिअरशी संबंधित समस्या भेडसावू शकतत. पण, कोणत्या राशींच्या लोकांना बुधाच्या राशिबदलाने नकारात्मक बदल जाणवू शकतात ते जाणून घेऊ…

मिथुन

बुधाच्या राशिबदलाने मिथुन राशी असलेल्या लोकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गरजांमुळे तुमच्या खिशावर भार येऊ शकतो. यावेळी वैवाहिक जीवनात काही मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी मतभेद आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्याशिवाय आत्मविश्वास कमी होऊ शकतो, ज्यामुळे कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

तूळ

बुध ग्रहाच्या राशिबदलाने तूळ राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यांच्या मानसिक ताण आणि दीर्घ आजारांशी संबंधित समस्या वाढू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो. यावेळी विशेषतः विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना संयम ठेवा.

धनू

बुधाचा राशिबदल धनू राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरू शकतो. या काळात तुमचे अनेकांशी शत्रुत्व निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः नोकरी आणि व्यवसाय करताना थोडी सावधगिरी बाळगा. या काळात आरोग्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः अॅलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. करिअरशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या, कारण- घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते.