November Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचा राजकुमार बुध साधारण १५ दिवसांनी आपली रास बदलतो. त्यामुळे तो वेगवेगळ्या राशींशी युती करून शुभ किंवा अशुभ योग तयार करतो. सध्या बुध वृश्चिक राशीत मंगळासोबत आहे आणि दोन्ही ग्रह अस्त स्थितीत आहेत. कर्क राशीत गुरू असूनही त्याचा जास्त फायदा होणार नाही.

बुध आणि मंगळ दोन्ही ग्रह अस्त असल्यामुळे काही भावांमध्ये त्यांचा संयोग होऊन विपरीत राजयोग नावाचा ताकदवान योग तयार होत आहे. हा योग नोकरी करणाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. बुध-मंगळाच्या या संयोगामुळे काही राशींना नशीबाची साथ मिळू शकते. हे विश्लेषण चंद्रराशीनुसार केले आहे. चला तर मग पाहू या की हा विपरीत राजयोग कोणत्या राशींना लाभ देऊ शकतो…

वैदिक ज्योतिषानुसार, १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ५:५३ वाजता बुध वृश्चिक राशीत अस्त झाले आहेत आणि २७ नोव्हेंबरपर्यंत या अवस्थेत राहतील. या काळात बुध आपल्या स्वतःच्या स्थानापासून सहाव्या, तिसऱ्या आणि आठव्या भावात मंगळासोबत विपरीत राजयोग तयार करत आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी हा विपरीत राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या कुंडलीत आठव्या भावात मंगळ आणि बुध यांच्या एकत्र येण्यामुळे हा योग तयार होत आहे. सध्या बुध आणि मंगळ दोन्हीही अस्त स्थितीत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो. वाद-विवाद कमी होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. अहंकार कमी होईल. जीवनसाथीसोबतचे मतभेद आणि भांडण संपुष्टात येऊ शकतात. तसेच तुम्ही तुमच्या नात्याला नवी संधी देऊ शकता.

कन्या राशी (Virgo Horoscope)

या राशीच्या तिसऱ्या भावात विपरीत राजयोग तयार होत आहे. बुध आणि मंगळाची युती या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. भाऊ-बहिणीं सोबत चांगला वेळ जाईल. करिअरच्या बाबतीत, तुम्ही ज्या प्रोजेक्टसाठी खूप दिवस मेहनत करत होता तो आता सफल होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार नीट मांडू शकाल. पराक्रम वाढेल आणि तुम्ही स्पर्धकांना जोरदार टक्कर द्याल. शत्रूंवर विजय मिळू शकतो. आर्थिक स्थितीही चांगली राहील. शासन-प्रशासनाशी संबंधित कामांतही फायदा होऊ शकतो.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठीही विपरीत राजयोग खूप अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या बाराव्या भावात हा राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांवर मंगळ आणि बुध दोघांचीही विशेष कृपा राहू शकते. मान-प्रतिष्ठा वाढू शकते. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. या काळात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायातही लाभ मिळू शकतो. स्वतःच्या बिझनेसमध्ये जलद वाढ होऊ शकते. आयुष्य अधिक आनंदी होऊ शकते. काही प्रवास करावे लागू शकतात, पण त्यातूनही चांगला फायदा मिळेल. आरोग्यही चांगले राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)