7 October Budh Yum Yog: वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचा राजकुमार बुध दर १५ दिवसांनी राशी बदलतो. त्यामुळे एका महिन्यात तो दोन राशींमध्ये फिरतो. बुधाची अशी स्थिती बदलली की त्याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो.

लवकरच बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे आणि तिथे २४ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. या काळात बुधाची इतर ग्रहांसोबत युती होत राहील. करवा चौथच्या आधी बुधाचा यमसोबत संयोग होऊन केंद्र दृष्टि योग तयार होत आहे. या योगामुळे तीन राशींच्या लोकांना खास लाभ होऊ शकतो. चला पाहू या त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…

वैदिक पंचांगानुसार ७ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून २२ मिनिटांनी बुध आणि यम एकमेकांपासून ९० अंशावर असतील. त्यामुळे केंद्र योग तयार होत आहे. सध्या यम मकर राशीत आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी बुध-यमचा केंद्र दृष्टि योग फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष्य गाठू शकता. बुध तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकतो. बँकेतून कर्ज घ्यायचे असल्यास त्यात यश मिळू शकते. कर्जातून सुटका होऊ शकते. तुम्ही स्पर्धकांपेक्षा चांगले प्रदर्शन कराल. मान-सन्मानातही जलद वाढ होऊ शकते. कला आणि साहित्य क्षेत्रातही तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ खूप चांगली ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनातील जुने त्रास संपुष्टात येऊ शकतात. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमचे लक्ष्य गाठू शकता. आईसोबतचे बिघडलेले संबंध सुधारू शकतात. जमीन-जुमल्याच्या बाबतीत फायदा होऊ शकतो, खरेदी किंवा विक्री करू शकता. घरात सुख-शांती राहील. मोठ्या लोकांशी ओळख होईल आणि त्यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी बुध-यमचा केंद्र योग फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. भाग्याचा स्वामी बुध दशम भावात असल्याने नोकरीत नवे संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होऊ शकतात. चांगला समन्वय झाल्यामुळे तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तसेच तुम्ही स्पर्धकांना कडवी टक्कर देऊ शकता. व्यवसायातही चांगला फायदा होऊ शकतो. यशाच्या पायऱ्या चढत जाल. लवकरच कीर्ती आणि सन्मान मिळू शकतो. कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)