Chaturmas 2024 Rashifal: महाराष्ट्रात आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे कारण म्हणजे पंढरपुरची वारी. आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक विठू नामाचा गरज करत वारीमध्ये सहभागी होतात. आषाढी एकादशी दिवशी पालखी पंढरपुरला पोहचते. या दिवशी सर्व भाविक उपवास करतात. तसेच जे भक्त वारीला येऊ शकले नाही ते देखील उपवास करतात आणि विठ्ठलाची पूजा करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देवशयनी एकादशीपासून सुरु होणार चातुर्मास

आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी व्रत (साधना) केली जाते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूचीश्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते.

४ महिने देव झोपणार पण, या ४ राशींचे भाग्य उजळणार!

देवशयनी एकदशीपासून भगवान श्री हरी विष्णू चातुर्मासाच्या ४ महिन्यांत योग निद्रामध्ये जातात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही. चातुर्मास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही विशेष आहे. यावेळी हे ४ महिने काही लोकांचे भाग्य उजळणार आहे. या वर्षी चातुर्मासाच्या ४ महिन्यांत ४ राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहील.

देवशयनी एकादशी पर शुभ योग

चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजेच १७ जुलैला देवशयनी एकादशीच्या दिवशी ‘सर्वार्थ सिद्धी योग’, ‘अमृत सिद्धी योग’, ‘शुभ योग’ आणि ‘शुक्ल योग’ असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. हा योग ४ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणेल. चातुर्मास (१७ जुलै ते १२ नोव्हेंबर २०२४) हा काळ कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे ते जाणून घ्या.

मेष

हे चार महिने तुमच्यासाठी खूप खास आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनात सकारात्मकता आणि आनंद वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ विशेषतः शुभ आहे.

हेही वाचा – आज गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ राशींचे नशीब पलटणार! करिअरमध्ये होईल प्रगतीसह, कमावतील बक्कळ पैसा

वृषभ

देवशयनी एकादशी वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातील सुवर्णकाळाची सुरुवात करेल. तुमच्या सर्व समस्या संपतील. नवीन नोकरी मिळेल. उत्पन्न वाढेल. करिअरसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.

हेही वाचा – तब्बल एका वर्षांनंतर चंद्राच्या राशीमध्ये निर्माण होणार ‘शुक्रादित्य राजयोग’, ‘या’ ३ राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठीही हे ४ महिने फलदायी आहेत. तुमचे काही मोठे काम पूर्ण होऊ शकते. धन, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांवरही भगवान विष्णूची कृपा असेल. या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रगतीचे मार्ग खुले होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. चांगला परतावा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात लाभदायक काळ आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaturmas will start from devshayani ekadashi auspicious yogas created god will sleep for 4 moths but this 4 zodiac signs will shine snk