Dev Diwali 2025: ५ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे. या वर्षी देव दिवाळीला काही राशींचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींना दिवाळीत इच्छित नोकरी मिळू शकते. शंकराच्या आशीर्वादाने या लोकांसाठी दिवाळी शुभ ठरेल. या राशींच्या लोकांना या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, जे भविष्यात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. तर मग जाणून घेऊया या कोणत्या चार भाग्यवान राशी आहेत…
मेष राशी
मेष राशीच्या लोकांची दिवाळीनिमित्त एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जोपर्यंत तुम्ही सकारात्मक रहाल, तोपर्यंत या दिवशी केलेले काम यशस्वी होईल. दिवाळीत नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत आणि नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना त्यांची आवडीची नोकरी मिळू शकते. तसंच आनंदाची बातमीदेखील मिळू शकते.
सिंह राशी
दिवाळीनिमित्त सिंह राशीच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीत तुम्हाला नवीन करार मिळू शकतो आणि व्यवसायात असलेल्यांना सुवर्ण संधी मिळू शकते. तुम्हाला भागीदारी किंवा गुंतवणुकीची ऑफर मिळू शकते. हा दिवस तुम्हाला प्रार्थनेत मग्न असा असेल. तु्म्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती आणि स्थिरतेची आशा करत आहात. तुम्ही नवीन काम करण्याचा प्रयत्नदेखील करत आहात, मात्र घाईघाईने निर्णय घेण्यापासून टाळा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे. तुम्हाला इतरांकडून पाठिंबा आणि मदत मिळेल.
कुंभ राशी
कुंभ राशीचे लोक देव दिवाळीत नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांना पटवून द्याल किंवा तुमच्या प्रकल्पचे सर्व पैलू समजावून सांगाल आणि त्यांची संमती मिळवाल. तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम यशस्वी होऊ शकतात. या दिवशी तुमचे संबंध चांगले असतील आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. असं असताना व्यवसायातील लोक देव दिवाळी त्यांच्या कामाबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात. तुमच्या कठोर परिश्रमाचे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी दिवाळी हा एक चागा दिवस असेल. एक नवीन संधी तुमच्या पुढे उभी असेल. ही प्रगतीची संधी हातून जाऊ देऊ नका. व्यावसायिकांनाही नफा कमावण्याची संधी मिळेल. तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. मीन राशीच्या लोकांसाठी या दिवशी नवीन घर खरेदी करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
