Dhanteras 2025 Aditya Mangal Rajyog: १७ ऑक्टोबरला सूर्य धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी राशी बदलणार आहे. सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत सध्या मंगळही आहे. त्यामुळे सूर्य आणि मंगळ यांच्या युतीने काही राशींना फायदा होणार आहे. या दोघांच्या युतीने “आदित्य-मंगळ राजयोग” तयार होईल. याचा परिणाम सगळ्यांवर होईल, पण विशेषतः वृषभ, मिथुन, कर्क आणि तूळ राशीवाल्यांसाठी हा योग खूप शुभ राहील. कारण तूळ राशीतच हे दोन्ही ग्रह जात आहेत.
मंगळामुळे त्यांना उर्जा आणि शक्ती मिळेल, तर सूर्य आत्मविश्वास वाढवतील. व्यवसाय चांगला चालेल आणि दिवाळीच्या काळात गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जास्त नफा होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आदित्य-मंगळ राजयोग शुभ ठरेल. या राशीच्या लोकांना कामात अडचणी येणार नाहीत आणि आपले लक्ष्य सहज गाठतील. प्रमोशन आणि प्रगतीची संधी मिळण्याचे योग आहेत. व्यापाऱ्यांना व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी चांगले योग बनत आहेत.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुमची कामे नशिबाच्या जोरावरही पूर्ण होतील. शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा होईल, पण तरीही काळजीपूर्वक वागा. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे ऑफिसमध्ये तुम्हाला जास्त जबाबदारी मिळू शकते.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी कुटुंबात आनंद येईल. वडिलांकडून आणि मुलांकडून फायदा होईल, नाती चांगली राहतील. तुमच्यासाठी धनलाभाचे योग बनत आहेत. ऊर्जा वाढल्यामुळे तुमची सगळी कामे सोपी होतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)