Diwali Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार या वर्षी भाऊबीज सण २३ ऑक्टोबरला आहे आणि त्यानंतर सूर्य व शुक्र यांची युती तूळ राशीत होणार आहे. सूर्य ग्रहाला मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचा कारक मानले जाते, तर शुक्र ग्रहाला वैभव, धन आणि ऐश्वर्याचा दाता मानले जाते. त्यामुळे ही युती झाल्यावर काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
अचानक धनलाभ होण्याची आणि प्रगतीची शक्यता आहे. पद-प्रतिष्ठाही मिळू शकते. संततीकडून शुभ वार्ता मिळू शकते. चला तर मग पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
धनु राशी (Sagittarius Horoscope)
सूर्य आणि शुक्राची युती धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ही युती तुमच्या राशीपासून ११व्या स्थानी होणार असल्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात. तुमच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल दिसतील. व्यापारात फायदा होईल आणि धनलाभ मिळेल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ छान जाईल.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र आणि सूर्याची युती शुभ ठरू शकतो. ही युती तुमच्या राशीपासून भाग्य आणि परदेश स्थानावर होत असल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. घरात सुख-समृद्धी आणि शांती राहील. तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
मकर राशी (Capricorn Horoscope)
सूर्य आणि शुक्राची युती मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. ही युती तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होत असल्याने या काळात तुम्हाला कामात चांगली प्रगती होईल. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील आणि तुम्ही लक्षपूर्वक काम करू शकाल. व्यापाऱ्यांना नवे ऑर्डर मिळून मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेले काम पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांनाही धनलाभ होऊ शकतो. तसेच या काळात वडिलांशी संबंध चांगले राहतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)