Diwali Horoscope: दिवाळीच्या वेळी अनेक वर्षांनंतर वैभव लक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. दिवाळीच्या दिवशी शुक्र आणि चंद्र या दोन ग्रहांची युती बुध ग्रह कन्या राशीत होईल. शुक्र आणि चंद्राची ही युती वैभव लक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग खूप शुभ आणि धनलाभ देणारा मानला जातो.

पंचांगानुसार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:११ वाजेपर्यंत चंद्र कन्या राशीत प्रवेश करतील आणि २१ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तिथेच राहतील. चंद्र कन्या राशीत जाताच शुक्रासोबत युती होईल आणि वैभव लक्ष्मी राजयोग बनेल. या योगामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचे नशीब उजळू शकते. चला तर मग पाहू या, शुक्र-चंद्र यांच्या या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

कन्या राशी (Virgo Horoscope)

शुक्र-चंद्र यांच्या युतीमुळे तयार झालेल्या वैभव लक्ष्मी राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या घरात आनंद आणि शांती राहील. धनप्राप्तीचे योग बनतील. अडकलेले पैसेही काही लोकांना मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी शुक्र-चंद्र यांच्या युतीने तयार झालेला वैभव लक्ष्मी राजयोग चांगली बातमी आणू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात वाढ होईल. आपल्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन डील फायदेशीर ठरू शकते. हा काळ नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही शुभ मानला जातो.

मकर राशी (Capricorn Horoscope)

शुक्र-चंद्र यांच्या युतीमुळे तयार झालेला वैभव लक्ष्मी राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. नशीब तुमच्या सोबत राहील. नवीन मार्गातून उत्पन्न मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी फायदेशीर डील मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)