Shukra Gochar In Cancer: वैदिक ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शुक्र ग्रह वैवाहिक जीवन, वासना, सुख, संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो. शुक्र हा देखील माता लक्ष्मीचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत असते त्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. या जुलै महिन्यात शुक्राचे दोनदा गोचर होणार आहे. येत्या ७ जुलै रोजी शुक्र कर्क राशीत गोचर करणार आहेत. तर ३१ जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहेत. या दरम्यान लक्ष्‍मी नारायण योग निर्माण होत आहे. यावेळी शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. यामुळे काही राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे चमकणार भाग्य?

मेष राशी

शुक्राचं दोनदा गोचर मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. पैशाची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे दोनदा राशी परिवर्तन लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

(हे ही वाचा : जुलै महिन्यात ‘या’ ५ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? चार मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?)

तूळ राशी

शुक्राचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यवसायाशी निगडित लोक प्रचंड यश प्राप्त करु शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते. 

वृश्चिक राशी

शुक्राचं दोनदा गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो.

मकर राशी

शुक्राचे दोनदा राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double shukra gochar in july 2024 venus transit in cancer positive impact of these zodiac sing can get huge money pdb