Mangal Gochar: मंगळ १३ सप्टेंबरला तूळ राशीत आले आहेत आणि ते २६ ऑक्टोबरपर्यंत इथेच राहतील. तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत. मंगळाचं हे गोचर मेष ते मीन या सर्व राशींवर परिणाम करणार आहे.

काही राशीसाठी ही वेळ खूप शुभ ठरू शकते. या काळात भाग्यवान राशींना मंगळाच्या कृपेने धन, करिअर, व्यवसाय आणि कुटुंबात चांगले परिणाम मिळू शकतात. चला तर मग पाहूया कोणत्या राशींना या गोचराचा फायदा होईल.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर शुभ राहणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होईल. समाजात मान–सन्मान मिळेल. नातेसंबंधात सुधारणा दिसेल. अविवाहितांना योग्य विवाह प्रस्ताव येऊ शकतात. व्यापारात भागीदारी होऊन फायदा होईल. पण या काळात घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा तूळ गोचर चांगले परिणाम देऊ शकतो. या काळात तुमचे जीवन आनंदी राहील. घरात आनंद येईल. प्रेमसंबंध चांगले राहतील. सुख–सोयी वाढतील. जीवनसाथीची पूर्ण साथ मिळेल. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर अनुकूल राहील. या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. समाजात मान–प्रतिष्ठा वाढेल. प्रयत्न यशस्वी ठरतील. तब्येत सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. एखादी चांगली बातमी मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)