Mangal Gochar 19 November Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार मंगळ ठराविक काळानंतर आपली रास आणि नक्षत्र बदलत असतो. साधारणपणे मंगळ एखाद्या राशीत ४५ दिवस राहतो. त्यामुळे मंगळाच्या नक्षत्र बदलाचा परिणाम बाराही राशींवर काही ना काही प्रकारे दिसून येतो.

सध्या मंगळ आपली स्वतःची वृश्चिक रास धारण करून रूचक राजयोग तयार करत आहे. तसेच सूर्य आणि बुध यांच्यासोबत त्याचा योगही होत आहे. आणि १९ नोव्हेंबरला मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ जेव्हा ग्रहांचा राजकुमार बुधाच्या नक्षत्रात जातो तेव्हा काही राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. बरेच दिवस अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि आत्मविश्वास वाढू शकतो. हे विश्लेषण चंद्रराशीच्या आधारावर केले आहे. चला तर आता कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत ते पाहूया…

वैदिक ज्योतिषानुसार मंगळ १९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:४० वाजता ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल आणि ७ डिसेंबर २०२५ पर्यंत तिथे राहील. ज्येष्ठा हे २७ नक्षत्रांपैकी १८वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे आणि रास वृश्चिक आहे. या नक्षत्रात प्रवेश केल्यावर लोकांची इच्छाशक्ती मजबूत होऊ शकते आणि नेतृत्व करण्याची क्षमता जलद वाढू शकते.

तूळ राशी (Libra Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या कुंडलीत मंगळ दुसऱ्या भावातून गोचर करणार आहे, त्यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास खूप वाढू शकतो. लग्नभावात शुक्रामुळे तयार होणारा मालव्य राजयोग तुमच्या नशिबाला साथ देऊ शकतो.

जीवनात सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होऊ शकते. अचानक पैशाचा लाभही मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ सुरुवात करण्यासाठी खूप चांगला आहे- यात नक्कीच नफा आणि यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधीही मिळू शकतात.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

या राशीच्या कुंडलीत मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करून लग्नभावात येणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला फायदा मिळू शकतो. नेतृत्व करण्याची क्षमता जलद वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. आत्मविश्वासही खूप वाढेल, त्यामुळे तुम्ही आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल. करिअरसोबत इतर क्षेत्रातही फायदा मिळू शकतो.

मंगळाची दृष्टि सातव्या भावावर पडत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सरकारकडून काही चांगला लाभ मिळू शकतो. तुम्ही खूप दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रॉपर्टी, वाहन इत्यादी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

मीन राशी (Pisces Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या कुंडलीत मंगळ भाग्यभावात बसलेला आहे. त्याचसोबत रूचक, मंगल आदित्य योग आणि त्रिग्रही राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाचा पूर्ण साथ मिळू शकतो.

नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ खूप चांगली ठरू शकते. नवीन नोकरी शोधत असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)