Laxmi Narayan Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करत असतात. यामुळे काही राजयोग किंवा अशुभ योग निर्माण होतात. ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. दरम्यान, एक वर्षांनंतर एप्रिलमध्ये राजयोग तयार होणार आहे. बुध आणि शुक्रदेवाच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण होत आहे. या राजयोगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. पण, तीन राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ होऊ शकतो. त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसाय मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : शनि-सूर्यदेवाची युती संपल्याने ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी )

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायाला नवा आयाम मिळण्याची शक्यता आहे. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एखादे प्रलंबित सरकारी काम या काळात पूर्ण होऊ शकते.

धनु राशी

लक्ष्मी नारायण राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकतो. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. इमारत आणि वाहनातून आनंद मिळण्याची शक्यता आहे. या काळात, तुम्हाला एक नवीन डील मिळू शकेल, ज्यातून तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury and venus will make in laxmi narayan rajyog these zodiac signs will be lucky pdb