Sun and Shani Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. नुकतीच कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनिदेवाची युती घडून आली होती. याचा अशुभ प्रभाव पडून काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडत होता. परंतु १४ मार्च रोजी ही युती संपली आहे. कारण आता सूर्यदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींसाठी अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहेत, पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा?

वृषभ राशी

सूर्य शनिदेवाची युती संपल्याने वृषभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो, ज्यामुळे खूप फायदा होऊन धनलाभ होऊ शकतो.

Shani To Open Locker Of Money On Buddha Pornima on 23rd May
शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट
Ruchak Raja Yoga will be formed the happy happiness
नवी नोकरी, भरपूर पैसा; १२ दिवसांनंतर तयार होणार रुचक राजयोग, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Blessing Of Maa Laxmi
डिसेंबर २०२४ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकते बक्कळ धनलाभाची संधी
Shash Rajyog 2024
२०२५ पर्यंत शनिदेव ‘या’ राशींना करणार लखपती? शुभ राजयोग घडल्याने लक्ष्मी कृपेने होऊ शकतात भाग्याचे धनी
6th May Panchang & Rashi Bhavishya
६ मे पंचांग: गुरुकृपेचा लाभ, गोडवा व इच्छापूर्ती; शिवरात्रीला आज कुणाचे नशीब चमकणार, महादेव देतील वरदान
Varuthini Ekadashi 2024
४ मे पासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? वरुथिनी एकादशीला ३ ‘शुभ राजयोग’ घडून आल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Trigrahi Yog in Aries
त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ ५ राशींना होणार अपार धनलाभ? ३ ग्रहांच्या युतीने लक्ष्मी येऊ शकते दारी

(हे ही वाचा: २४ एप्रिलपर्यंत प्रचंड पैसे कमावतील ‘या’ राशी? शुक्र आणि राहूची युती होताच लक्ष्मीकृपेने होऊ शकतो मोठा धनलाभ)

मकर राशी

मकर राशीच्या लोकांना सूर्य शनिदेवाची युती संपल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकतो. हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरु शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. व्यवसायात वाढ होऊ शकते. तसेच समाजात मानसन्मान वाढू शकते.

कुंभ राशी

सूर्य शनिदेवाची युती संपल्याने कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)