10 November Budh Vakri Impact on Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार बुध ग्रहाला व्यापार, पैसा, बोलणे, विचारशक्ती, गणित आणि शेअर बाजाराचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा बुध ग्रहाची चाल बदलते, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. १० नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत. बुध ग्रह तूळ राशीत वक्री चालतील. त्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊ या कोणत्या राशींना हा काळ शुभ ठरणार आहे.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

बुध देवाची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीपासून ११व्या स्थानी वक्री होतील. त्यामुळे जर तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करणार असाल, तर त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात उत्पन्न वाढेल. शेअर मार्केट, सट्टा किंवा लॉटरीतही लाभ मिळू शकतो. पैशांची आवक वाढेल आणि मालमत्तेतही वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांकडून मदत मिळेल आणि एखादा अडकलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. तसेच तुम्हाला मुलांबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कर्क राशी (Cancer Horoscope)

तुमच्यासाठी बुध ग्रहाची उलटी चाल फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या कुंडलीत सुख-सुविधांच्या भावात वक्री होतील. त्यामुळे या काळात तुम्हाला सुख-सुविधा मिळतील. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. गुंतवणूक आणि नवीन योजना यातून तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला पितृसंपत्ती किंवा वारसाहक्काची मालमत्ता मिळू शकते. या काळात आई आणि सासरच्या लोकांशी नाते अधिक चांगले राहतील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

बुध ग्रहाचे वक्री होणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या कुंडलीत धन आणि वाणीच्या भावात वक्री होतील. तसेच ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. परदेशाशी संबंधित व्यापार किंवा आयात-निर्यात कामात यश मिळेल. तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्यावर खुश होतील. हा काळ आत्मविश्वास, यश आणि धैर्य वाढवणारा असेल. तुम्हाला एखादे मोठे काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकते. मार्केटिंग, शिक्षण, बँकिंग किंवा बोलण्याशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)