Daily Horoscope 18 March 2024 : १८ मार्च, पंचांग : आठवड्याचा पहिला दिवस सर्व राशींसाठी कसा जाईल? आज कोणत्या राशींना अचानक धनलाभ होईल जाणून घ्या. पाहा तुमच्या राशीचे आजेचे भविष्य.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:-आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उठाव येईल. तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल. चौकसपणा दाखवाल. तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल.

वृषभ:-अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल. मुलांचे मत विचारात घ्यावे. कमिशन मधून फायदा मिळेल.

मिथुन:-चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल. हातातील अधिकार वापरण्याची संधि मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलाल.

हेही वाचा : Shani Uday 2024 : होळीपूर्वी अडचणीत येऊ शकतात ‘या’ राशी; शनिदेवाचा होऊ शकतो त्रास

कर्क:-सर्वासमोर आपली कला सादर करता येईल. घरासाठी सजावटीचे सामान खरेदी केले जाईल. टाप-टिपीकडे अधिक लक्ष द्याल. स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.

सिंह:-पोटाची तक्रार जाणवेल. वात-विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

कन्या:-अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.

तूळ:-प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मौज-मजेकडे कल राहील.

वृश्चिक:-हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

धनू:-आवडते पुस्तक वाचायला मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल. चौकसपणे माहिती गोळा कराल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.

मकर:-जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. तीर्थयात्रेसाठी नाव नोंदवाल.

कुंभ:-अघळपघळ बोलणे टाळा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.

मीन:-मानसिक शांतता जपावी. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवसभर घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monday 18th march panchang daily horoscope mesh to meen rashi bhavishya how will your monday will be some zodiac might receive money check out dha