Grahan Dosh In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने भ्रमण करतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. १३ जुलै रोजी राहू आणि चंद्राची युती कुंभ राशीत होणार आहे. त्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे.या योगाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु यावेळी ३ राशी अशा आहेत ज्यांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.कारण या राशींमध्ये पैशाचे नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. पैसे कुठेतरी अडकू शकतात. त्यामुळे या लोकांनी सावधगिरी बाळगावी असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ म्हणतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत…

‘या’ राशीच्या लोकांसाठी घातक आहे ग्रहण योग!

सिंह राशी

ग्रहण तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या सातव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी तणावपूर्ण असू शकते. तसेच, कुटुंबातील एखाद्याशी वाद होऊ शकतो.सामाजिक जीवनात अनिश्चितता आणि अंतर देखील निर्माण होऊ शकते. आर्थिक परिस्थिती डळमळीत होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च किंवा अडथळा येऊ शकतो. त्याच वेळी, या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते. म्हणून, बाहेरचे अन्न खाणे टाळा.

कुंभ राशी

ग्रहण तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण यावेळी तुमच्या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता आणि बॉस किंवा वरिष्ठांशी समन्वय कमी होऊ शकतो.तसेच, या काळात तुम्ही काळजीपूर्वक गाडी चालवावी कारण अपघात होण्याची शक्यता असते.तसेच, तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून, यावेळी तुमचे काम बदलू नका. यावेळी मानसिक ताण देखील येऊ शकतो.

धनु राशी

ग्रहण योगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे, यावेळी तुम्हाला तुमच्या भावंडांचा पाठिंबा मिळणार नाही. तसेच, तुमची सामाजिक प्रतिष्ठा कमी होऊ शकते किंवा काही टीका होऊ शकते. यावेळी लपलेले शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. महत्त्वाचे काम रखडू शकते. तसेच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच वाद टाळा.