Best Rakhi According To Your Brother’s Zodiac Sign : हिंदू धर्मात रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचे महत्त्व सांगणारा अत्यंत पवित्र सण मानला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमाही साजरी केली जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी बहीण ओवाळणी करत आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षेसाठी आणि त्याच्या आनंदासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात.
यंदा रक्षाबंधनावर भद्रकाळाची अशुभ सावली नाही, त्यामुळे बहिणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकतात. पण, बहिणींनी भावाच्या राशीनुसार राखी खरेदी करावी. यात भावाच्या राशीनुसार राखीचा रंग निवडल्यास फायदा होईल. कोणत्या राशीसाठी कोणत्या रंगाची राखी खरेदी करणं शुभ ठरू शकते जाणून घेऊ…
मेष : भाऊ जर मेष राशीचा असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधली तर वर्षभर नात्यात गोडवा राहील, त्याला नशिबाची चांगली साथ मिळेल; कारण या राशीसाठी लाल रंग भाग्यशाली मानला जातो.
वृषभ : रक्षाबंधनाच्या दिवशी वृषभ राशीच्या भावाला पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची राखी बांधावी, यामुळे भावाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मिथुन : तुमच्या भावाची मिथुन रास असेल तर त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी, याने त्यांच्या कारकिर्दीत यश मिळेल.
कर्क : कर्क राशीचा भाऊ असेल तर त्याला पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची राखी बांधावी, यामुळे भावाचे वाईट नजरेपासून रक्षण होते असे मानले जाते.
सिंह : सिंह राशीच्या भावाला लाल किंवा केशरी रंगाची राखी शुभ मानली जाते. असे केल्याने भावाला प्रत्येक कामात चांगली प्रगती साधता येते असे मानले जाते.
कन्या : रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या भावाची रास कन्या आहे त्याला हिरव्या रंगाची राखी बांधावी, यामुळे भाऊ आणि बहिणीमधील प्रेम वाढते असे म्हटले जाते.
तूळ : रक्षाबंधनाच्या दिवशी तूळ राशीच्या भावाला गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची राखी बांधणं शुभ मानलं जातं.
वृश्चिक : तुमच्या भावाची रास जर वृश्चिक असेल तर त्याला लाल रंगाची राखी बांधावी, यामुळे भावाचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
धनु : धनु रास असलेल्या भावाला पिवळ्या किंवा केशरी रंगाची राखी बांधणं शुभ मानलं जातं.
मकर, कुंभ : मकर आणि कुंभ राशीच्या भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी निळ्या किंवा डार्क निळ्या रंगाची राखी बांधावी. या रंगाच्या राख्या बांधल्या तर त्यांना जीवनात यश-धन मिळेल.
मीन : रक्षाबंधनाच्या दिवशी मीन राशीच्या भावाला पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची राखी बांधावी. असे केल्याने कुटुंबातील भावंडांमधील प्रेम वाढते असे म्हटले जाते.