Rashibhavishya Today Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे १२ राशींच्या नशिबी आज काय असणार आहे त्याचा संपूर्ण आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 16 July 2025 : आजचे राशिभविष्य १६ जुलै २०२५

23:30 (IST) 16 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

20:58 (IST) 16 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

18:17 (IST) 16 Jul 2025

२४ तासात सूर्य करणार मोठा गोचर! ‘या’ ३ राशींवर धनवर्षा होणार, मिळणार अपार श्रीमंती!

Sun Transit In Cancer : सूर्य देव २४ तासानंतर कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच काही राशींना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. जाणून घेऊ या त्या लकी राशी कोणत्या आहेत. …सविस्तर वाचा
18:02 (IST) 16 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.

18:01 (IST) 16 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा.

17:51 (IST) 16 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा.

17:12 (IST) 16 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.

16:10 (IST) 16 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.

15:49 (IST) 16 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

15:26 (IST) 16 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.

13:34 (IST) 16 Jul 2025

कियारा – सिद्धार्थला झाली गोंडस मुलगी! ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली कशा असतात, जाणून घ्या…

Numerology Predictions: सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, हे बॉलीवूड कपल आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे. यादरम्यान, आता अंकशास्त्राच्या मदतीनं आपण पाहूया की, १५ जुलैला जन्मलेल्या मुलींचं व्यक्तिमत्त्व कसं असतं? …अधिक वाचा
12:49 (IST) 16 Jul 2025

३१ जुलैपासून ‘या’ तीन राशींचं नशिब चमकणार! शनिच्या अद्भुत योगामुळे मिळणार अपार संपत्ती

Astrology Predictions : शतांक योग निर्माण झाल्याने काही राशींना फायदा होणार आहे. आज आपण त्याच राशींविषयी जाणून घेणार आहोत. …वाचा सविस्तर
11:27 (IST) 16 Jul 2025

२८ जुलैनंतर पाण्यासारखा खर्च कराल पैसा अन् होऊ शकतं मोठं नुकसान! ‘या’ ५ राशींना पडेल महागात मंगळाची शत्रू ग्रहासोबत युती

Horoscope after Mars Transit 2025: त्यांची ही युती ५ राशींच्या करिअर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या ५ राशी. …अधिक वाचा
11:20 (IST) 16 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.

11:14 (IST) 16 Jul 2025

१२ वर्षानंतर मिथुन राशीत निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ तीन राशींवर देवी लक्ष्मीच्या कृपेने गजगंज श्रीमंतीचा योग

Gajlaxmi Rajyog 2025: पंचांगानुसार, २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. …वाचा सविस्तर
10:52 (IST) 16 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

10:43 (IST) 16 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.

10:31 (IST) 16 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्‍याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.

10:06 (IST) 16 Jul 2025

बुधदेव चालणार सरळ चाल; ऑगस्टमध्ये ‘या’ राशीच्या व्यक्तींना मोठं सरप्राईज मिळणार? घरी सोन्याच्या पावलांनी येईल लक्ष्मी!

Budh Margi 2025: बुध ग्रह होणार मार्गी, नशिबाचं चक्र फिरणार ‘या’ राशींसाठी, जाणून घ्या तुमचं नांव आहे का? …सविस्तर बातमी
08:35 (IST) 16 Jul 2025

आता नुसता पैसा! एक वर्षानंतर चंद्राच्या राशीत ‘लक्ष्मीनारायण योग’; ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

Shukra and Budh Yuti: बुध आणि शुक्र ग्रहाच्या कर्क राशीतील प्रवेशाने ‘लक्ष्मीनारायण योग’ निर्माण होईल. हा योग ३० ऑगस्टपर्यंत असेल. …सविस्तर बातमी
08:25 (IST) 16 Jul 2025

‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप रागीट! पैशांमुळे विसरतात नाती, पण लोकांना सहज करतात आकर्षित

Numerology Traits: या मुली आत्मविश्वासी आणि आकर्षक स्वभावाच्या असतात, पण थोड्या रागीट आणि स्वतःपुरत्या राहणाऱ्या देखील असतात. …वाचा सविस्तर
08:12 (IST) 16 Jul 2025

Horoscope Today: कर्क संक्रांतीला कोणत्या राशीचे चमकणार नशीब? कोणाच्या कष्टाचे होईल चीज तर कोणाच्या भाग्यात दिसेल सूर्यासम तेज; वाचा राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi, 16 July 2025: कर्क संक्रांतीला तुमच्या आयुष्यात साकारात्मतक बदल होणार का जाणून घेऊया… …सविस्तर बातमी

(Photo Courtesy- Freepik)