September Vrat Tyohar List २०२४: हिंदू धर्मात अनेक परंपरा, चालीरीती आणि सण आहेत. प्रत्येक महिन्यात काही खास दिवस, उपवास आणि उत्सव असतात. प्राचीन काळापासून आपल्याकडे महिने, सण उत्सव उत्साहाने साजरे करण्याची परंपरा आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरु आहेत त्याबरोबर गणरायाच्या आगमनाचे वेधही सर्वांना लागले आहे. सप्टेंबर महिन्यास गौरी-गणपतीच्या आगमनासह कोणकोणते महत्त्वाचे सण आणि दिवस येणार आहेत हे जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात श्रावण आणि भाद्रपद हे मराठी महिना येतात. ४ सप्टेंबरपासून भाद्रपद महिना सुरु होत आहे. हा महिना उपवास आणि सणांच्या दृष्टीने खूप खास आहे. गणेश चतुर्थी, ऋषीपंचमीसह अनेक महत्त्वाचे सण इंग्रजी कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये येतात. तसेच या महिन्यात पितृ पक्षही सुरू होत आहे. सप्टेंबर महिन्यात दानधर्म करण्याचेही विशेष महत्त्व आहे. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या सर्व उपवास आणि सणांबद्दल जाणून घेऊया…

हेही वाचा – पितृपक्षात कन्या राशीतून तूळ राशीमध्ये येणार शुक्र! एक दोन नव्हे तर चक्क १० राशींना धनलाभाचा योग

सप्टेंबर व्रत- उत्सव यादी २०२४

  • १ सप्टेंबर २०२४, रविवार- श्रावण, पर्युषण पर्वारंभ, मासिक शिवरात्री,
  • २ सप्टेंबर २०२४, सोमवार- अमावस्या, पोळा,
  • ४ सप्टेंबर २०२४ – मंगळवार – भाद्रपद मासारंभ
  • ६ सप्टेंबर २०२४, शुक्रवार- हरितालिका,
  • ७ सप्टेंबर २०२४- शनीवार – श्रीगणेश चतुर्थी
  • १० सप्टेंबर २०२४, मंगळवार- ज्येष्ठा गौरी आवाहन
  • ११ सप्टेंबर २०२४, बुधवार – दुर्गाष्टमी, जेष्ठागौरी पूजन
  • १२ सप्टेंबर २०२४, गुरुवार – ज्येष्ठा गौरी विसर्जन
  • १६ सप्टेंबर २०२४, सोमवार – ईद-ए- मिलाद
  • १७ सप्टेंबर २०२४, मंगळवार – अनंत चतुर्दशी, पितृपक्ष प्रारंभ, प्रोष्ठप्रदी पोर्णिमा
  • १८ सप्टेंबर२०२४, बुधवार – प्रतिपदा श्राद्ध, खंडग्रास चंद्रग्रहण, भाद्रपद पौर्णिमा.
  • १९ सप्टेंबर २०२४ गुरुवार – द्वितीया श्राद्ध
  • २० प्टेंबर २०२४, शुक्रवार – तृतीया श्राद्ध
  • २१ सप्टेंबर २०२४, शनिवार- संकष्टी चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध- भरणी श्राद्ध
  • २२सप्टेंबर २०२४, रविवार – पंचमी श्राद्ध,षष्ठी श्राद्ध
  • २३सप्टेंबर २०२४- सोमवार – सप्तमी श्राद्ध
  • २४ सप्टेंबर २०२४- मंगळवार – कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध
  • २५ सप्टेंबर २०२४, बुधवार – नवमी नवमी श्राद्ध,
  • २६ सप्टेंबर २०२४, गुरुवार – दशमी श्राद्घ
  • २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार – एकादशी श्राद्ध
  • २८सप्टेंबर २०२४, शनिवार – इंदिरा एकादशी
  • २९ सप्टेंबर २०२४, रविवार- द्वादशी श्राद्ध, माघ श्राद्ध,
  • ३० सप्टेंबर २०२४, सोमवार – त्रयोदशी त्रयोदशी श्राद्ध, मासिक शिवरात्री

ऑक्टोबर महिन्यात पितृपक्ष समाप्त होणार आहे.

  • १ ऑक्टोबर २०२४- मगंळवार -चतुर्दशी श्राद्ध
  • २ अक्टूबर २०२४ बुधवार- सर्वपितृ अमावस्या
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: September 2024 list of festivals gauri ganpati pitru paksha see complete list here snk