9th March Marathi Horoscope & Rashi Bhavishya: आज ९ मार्च २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत सिद्ध योग कायम असणार आहे. शनिवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे व त्यानंतर शतभिषा नक्षत्र सुरु होईल. ही दोन्ही नक्षत्रे शनीच्या स्वामित्वाची मानली जात असल्याने मेष ते मीन राशीवर शनीचा प्रभाव दिसून येईल. नेमक्या कोणत्या राशीच्या कुंडलीत काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:-स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा.

वृषभ:-आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल.

मिथुन:-प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

कर्क:-जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नावलौकिकास पात्र व्हाल.

सिंह:-गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.

कन्या:-अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

तूळ:-घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल.

वृश्चिक:-शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.

धनू:-चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल. स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत.

मकर:-चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे. स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:-काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे.

हे ही वाचा<< शनी महाराज गुरूच्या नक्षत्रात येऊन ‘या’ राशींना देणार तन-मन-धनाचे लाभ; गुढीपाडव्याच्या आधी होईल आयुष्याचं सोनं

मीन:-कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani amavasya panchang rashi bhavishya 9th march shatbhisha dhanishtha nakshtra to be active daily horoscope mesh to meen svs