Shani Nakshatra Gochar 6th April 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज येत्या तीन दिवसात म्हणजेच ६ एप्रिलला पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहेत. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर होऊ शकतो. ६ एप्रिलला दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी हे गोचर पूर्ण होणार आहे. शनीने यापूर्वी २४ नोव्हेंबरला शतभिषा नक्षत्रात गोचर केले होते. आता ६ एप्रिलपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या आधी काही राशींच्या नशिबाला लागलेले टाळे उघडणार आहे. मागील काही दिवसात चालू असलेल्या आर्थिक अडचणी संपून या राशींना लाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाला लागलेले टाळे उघडणार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनीचे गोचर मेष राशीच्या मंडळींसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. या कालावधीत धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वाडवडिलांची मदत होऊ शकते. या महिन्यात पैसे गुंतवण्यावर भर द्या. नव्या प्रॉपर्टी किंवा सोन्याच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवणे कधीही उत्तम. व्यवसायात सुद्धा फायदा घडवून देणारी एखादी डील पूर्ण होऊ शकते. सरकारी नोकरीची संधी चालून येऊ शकते. हा महिना चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी शनी गोचर अनुकूल सिद्ध होऊ शकतात. या मंडळींना नोकरी व व्यवसाय दोन्हीमध्ये फायदा होऊ शकतो. पगारवाढीचा योग आहे. प्रमोशनसाठी सुरु असलेले प्रयत्न अखेरीस यशस्वी होतील. आर्थिक सबलता येईल. करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल. प्रेमाच्या नात्यात गोडवा येईल. लग्नाच्या बाबत येणाऱ्या अडचणी दूर होतील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीला मागील काही दिवसांमध्ये आपल्या प्रेमाच्या व हक्काच्या नात्यांमध्ये सुद्धा गैरसमजुतीमुळे अडचणी येण्याचा काळ सुरु होता मात्र शनी गोचरासह आपले दिवस पालटणार आहेत. या कालावधीत सुख व सुविधा आपल्या नशिबात येतील. करिअरमध्ये चार पाऊले पुढे जाऊ शकता. नाती भक्कम होतील व याच संबंधांच्या बळावर आपण धनलाभ सुद्धा मिळवू शकता.

हे ही वाचा <<चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या लोकांना हवा तसा जॉब मिळवून देण्यासाठी शनीचे गोचर मदत करेल. व्यावसायिकांना सुद्धा या कालावधीत मोठ्या डील मार्गी लावता येतील. गुंतवणुकीला प्राधान्य द्या. नात्यांमध्ये ताळमेळ साधता येईल. अनेकांकडून मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani nakshatra gochar on 6th april 2024 to give speedy money earning to four rashi will get promotions after saturn transit svs