Shani Sadesati Zodiac Signs: शनीचं गोचर खूपच हळू असतं. त्यामुळे कर्मफळ देणारा शनी एक पूर्ण राशिचक्र फिरायला साधारण ३० वर्षे घेतो. सध्या शनी मीन राशीत आहे. २०२६ मध्ये शनीची राशी बदलणार नाही आणि तो गुरुच्या मीन राशीतच राहणार आहे.

शनीची साडेसाती कठीण मानली जाते. ज्यांच्या राशींवर साडेसातीचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागतो. चला तर मग पाहूया, २०२६ मध्ये शनीच्या गोचरामुळे कोणकोणत्या राशींवर साडेसातीचा प्रभाव राहणार आहे.

शनीची साडेसती म्हणजे काय?

जेव्हा शनी ग्रह जन्मराशीतून बाराव्या, पहिल्या आणि मग दुसऱ्या भावात जातो, तेव्हा शनीची साडेसाती सुरू होते. शनीची ही अवस्था साधारण ७.५ वर्षे टिकते. ती तीन भागांत विभागलेली असते. प्रत्येक भाग साधारण दीड-दीड वर्षांचा असतो.

२०२६ मध्ये या राशींवर शनीचा प्रभाव असेल आणि त्यांच्यावर शनीच्या साडेसातीचा परिणाम होईल.

ज्योतिषानुसार सध्या शनी मीन राशीत आहे आणि २०२६ मध्येही तो या राशीतच राहणार आहे. त्यामुळे शनीच्या गोचरामुळे मेष, कुंभ आणि मीन राशींवर साडेसातीचा प्रभाव राहील. तसेच सिंह आणि धनु राशींवर शनीची ढय्या लागू राहणार आहे.

मेष राशी (Shani Sadesati on Aries)

मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा राहील.

मीन राशी (Shani Sadesati on Pisces)

मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा राहील.

कुंभ राशी (Shani Sadesati on Aquarius)

कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा राहील.

यावर उपाय काय करू शकता?

शनिवारी मोहरीचे तेल दान करा.

हनुमान चालीसा पठण करा.

काळे तीळ दान करा.

शिव चालीसा पठण करा.

ब्लँकेट दान करा.

शनीचा चालीसा पठण करा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)