Baba Vanga 2026 Predictions: जगभरातील भविष्यवेत्त्यांमध्ये एक नाव म्हणजेच बाबा वेंगा. अंध व्यक्ती असूनही तिच्या अचूक भविष्यवाण्यांमुळे तिला जगभरात प्रसिद्धी मिळाली. आता तिच्या २०२६ साठीच्या भविष्यवाण्या ऐकून जगभरात खळबळ उडाली आहे. तिच्या अनुयायांचा विश्वास आहे की, बल्गेरियामध्ये जन्मलेल्या या तज्ज्ञ भविष्यवेत्तीने जागतिक संघर्ष, आपत्ती आणि परग्रही संपर्क यांचे भयंकर संकेत दिले आहेत.

जागतिक युद्धाची शक्यता:

Daily Star च्या अहवालानुसार वेंगा म्हणाल्या की, २०२६ मध्ये तिसरे जागतिक युद्ध सुरू होऊ शकते. त्यांच्या मते, “वसंत ऋतूत, पूर्वेकडील युद्ध सुरू होईल आणि हे युद्ध पश्चिमेकडे विस्फोट करेल.” काही रिपोर्ट्समध्ये त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन “जगाचा अधिपती” होईल असेही सांगितले आहे. यामुळे युरोप काही प्रमाणात “वाळवंटासारखा” होण्याची शक्यता दिसते.

प्राकृतिक आपत्तींचा भयंकर धोकाः

वेंगा यांनी २०२६ साठी भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि हवामानातील असामान्य बदल यांचा इशारा दिला आहे. तिच्या भविष्यवाण्यानुसार, या आपत्तींमुळे पृथ्वीच्या सुमारे ७-८% भूभागावर प्रचंड नुकसान होऊ शकते. जीवसृष्टी आणि मूलभूत पायाभूत सुविधा धोक्यात येऊ शकतात.

तंत्रज्ञानाचा ताबाः

या वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इतकी प्रगत होईल की, मानवांच्या जीवनावर पूर्ण ताबा मिळवेल असेही वेंदा यांनी सांगितले. रोजच्या नोकऱ्या, संबंध, अगदी दैनंदिन व्यवहारही AI नियंत्रित करेल. त्यांच्या मते, २०२६ हे वर्ष मानवजातीसाठी यंत्रांवर अवलंबून राहण्याची सुरुवात ठरू शकते.

परग्रही आगमनाचा भयंकर इशारा:

कदाचित सर्वात आश्चर्यकारक भविष्यवाणी म्हणजे जागतिक अंतराळात परग्रही यांचं आगमन नोव्हेंबर २०२६ मध्ये होणार आहे, ज्यामुळे मानवजातीला पहिल्यांदाच परग्रही संपर्काची पुष्टी मिळेल.

बाबा वेंगा कोण होत्या?

बाबा वेंगा, खऱ्या नावाने वांगेल्या पांडेवा दिमित्रोवा, १९११ मध्ये बाबा वेंगा यांचा जन्म झाला. १२ व्या वर्षी चक्रीवादळात डोक्याला धक्का लागल्याने त्यांची दृष्टी गेली. ३० व्या वर्षापर्यंत त्यांना भविष्यवाणी आणि उपचार करण्याची कला अवगत झाली होती. बाबा वेंगांचे १९९६ मध्ये ८४ वर्षांच्या वयात निधन झाले आणि त्यांचे घर पेत्रिच, बल्गेरियामध्ये नंतर संग्रहालयात रूपांतरित केले गेले.

बाबा वेंगांच्या २०२६ साठीच्या भविष्यवाण्या खूपच धक्कादायक आहेत. जागतिक संघर्ष, प्राकृतिक आपत्ती, AI चा प्रभाव आणि परग्रही संपर्क या सर्व गोष्टी मानवजातीसाठी मोठा इशारा ठरू शकतात. जगभरातील लोक आता नोव्हेंबर २०२६ पर्यंत सावधगिरीने पाहत आहेत की त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये किती सत्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)