Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. दिवाळीनंतर शुक्र राशी परिवर्तन करणार आहे. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा परिणाम राशिचक्रातील प्रत्येक राशींच्या लोकांवर दिसून येतो. शुक्राला सुख, समृद्धी, धन वैभव, प्रेम आणि आकर्षणाचा कारक मानला जाते. शुक्र ७ नोव्हेंबर रोजी राशी परिवर्तन करतोय. शुक्र गुरूची राशी धनुमध्ये प्रवेश करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्राचे राशी परिवर्तन केल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो तर काही राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण शुक्र गोचरचा कोणत्या राशींना लाभ होईल, हे जाणून घेणार आहोत.

मेष राशी (Mesh zodiac)

शुक्राचे धनु राशीमध्ये राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. अडकलेले काम पूर्ण होतील. तसेच धनलाभ होण्याची शक्यता वाढेन. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. विदेशातून सुद्धा या लोकांना लाभ होईन. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळेल. हे लोक आनंदी राहीन. या लोकांचे प्रेमसंबंध चांगले राहीन. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार. पण या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

हेही वाचा : Weekly Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

मिथुन राशी (Mithun zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे धनु राशीमध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये शुक्र सातव्या भावात आहे. या राशीच्या लोकांचे नवीन मित्र बनणार. या लोकांना करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळेन. यांना नवीन नोकरी मिळण्यासाठी अनेक संधी मिळू शकतात. कामा संबंधित नवीन यात्रा होऊ शकतात. हे आपल्या ध्येयाचा पाठलाग करतील. यांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. या लोकांचा खूप जास्त पैसा खर्च होऊ शकतो. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता. आरोग्य सुद्धा उत्तम राहीन.

कन्या राशी (Kanya zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे धनु राशीमध्ये प्रवेश करणे लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये शुक्र चौथ्या स्थानी आहे. दुसऱ्या आणि नवव्या भावात स्वामी असल्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळते. कार्यक्षेत्रात या लोकांची मेहनत आणि काम पाहून यांचे वरिष्ठ खूश होतील. पदोन्नतीसह या लोकांना इंक्रीमेंट मिळू शकते. मान सन्मान वाढू शकतो. व्यवसाय क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो. प्रेम संबंध दृढ होतील. नात्यात आनंद दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 2024 venus will enter sagittarius after diwali three zodiac signs will get a new job money and wealth ndj