Sun Transit in Libra : सर्व ग्रह राशींमध्ये फिरत राहतात, त्याप्रमाणे सूर्यदेवही काही राशीमध्ये फिरत असतात. आतापर्यंत सूर्यदेव ग्रहांचा राजकुमार बुधची राशी कन्यामध्ये होते, पण आता ते कन्या राशीतून तूळ राशीत गेले आहेत. सूर्य तूळ राशीत आल्याने ते आपले तेज काही प्रमाणात कमी करतील, कारण तूळ राशीत ते निम्न स्थानी असल्याने त्यांची शक्ती कमी होते. यामुळेच सूर्यदेव या ठिकाणी येताच काहीसे सौम्य होतात. अशातच आता ते १७ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत असणार आहेत. सूर्यदेव तूळ राशीत आल्याचा काही रांशींवर प्रभाव पडणार आहे. तर या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरु शकते. कारण एकीकडे सूर्य आपली ताकद या राशीकडे सोपवणार आहेत. या काळात तूळ राशीच्या लोकांना अनावश्यक चिंता आणि रागापासून दूर राहू शकतात. या काळात तुमचे थकीत पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमच्या मोठ्या भावाची प्रगती होऊ शकते. तुमच्या जोडीदाराला काही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील मोठा भावंडाची लग्न ठरु शकतात.

वृश्चिक रास

सूर्याचे राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना प्रवास घडू शकतो. १७ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या खर्चाचे नियोजन करु शकता पण एखाद्या चांगल्या व्यवहारामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा- तब्बल ३० वर्षांनी दसऱ्याला जुळून आलाय ‘शुभयोग’; ‘या’ राशींच्या घरात येईल प्रचंड पैसा? व्यवसायात मिळू शकतो मोठा लाभ

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी मोठा भाऊ आणि वडिलांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे फायदेशीर ठरु शकते. जर तुम्ही त्यांच्यासोबत राहत नसाल तर त्यांच्याशी बोलू शकता. ३० ऑक्‍टोबरपर्यंत कोणतेही महत्‍त्‍वाचे निर्णय घेणं शक्यतो टाळा. कुटुंबातील सदस्यांची तब्येत काही कारणाने बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासू शकते. कारण या काळात तुमची आक्रमकता वाढू शकते. तुमच्या घराचे नूतनीकरण करणे तुमच्यासाठी चांगले ठरु शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun transits in libra these people will get respect and wealth by 17th november jap