Surya-Yam Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सूर्य शनीच्या कुंभ राशीत विराजमान असून तो इथे यमासह ‘द्विदादश योग’ निर्माण करत आहे. २० फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सूर्य आणि यम एकमेकांपासून ३० डिग्रीवर असतील. ज्यामुळे हा योग निर्माण होईल. या योगाचा १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ परिणाम पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशी देणार प्रत्येक क्षेत्रात यश

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार ‘द्विदादश योग’ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. या काळात तुम्हाला विशेष लाभ होईल. या योगामुळे आकस्मिक धनलाभही होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी ‘द्विदादश योग’ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुमच्या नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ‘द्विदादश योग’ खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त कराल. व्यवसायात प्रगती होईल. आरोग्यही उत्तम राहिल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya yam yuti 25 after 24 hours these three zodic sign will get money progress and material happiness sap